बातमी 24तास,ऑनलाईन न्यूज पोर्टल
(कल्पेश अ. भोई )
बारामती पाठोपाठ आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या शिरूर लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांची चिंता काही प्रमाणात का होईना नक्कीच वाढलेली असेल. निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ या वाद्याचा मराठी उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे.बारामती लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारसंघात काही ना काही संभ्रम झाल्याचे चित्र दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने सुप्रिया सुळेंच तुतारी हे चिन्ह आणखी एका उमेदवाराला म्हणजेच सोहेल शेख या उमेदवाराला थोडासा बदल करून देण्यात आल्याची घटना घडली आहे.
बारामती पाठोपाठ आता शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम : शिरूर मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेची चिंता काही प्रमाणात का होईना वाढली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह चाकण येथील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. मात्र तुतारी चिन्हांवरून जो काही संभ्रम होत आहे याचा फटका अमोल कोल्हेंना बसणार का हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.याप्रकरणी शिरूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. विरोधी पक्ष उमेदवाराला म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हामध्ये मतदाराची दिशाभूल होणार नाही. परंतु या चिन्हाचा माझ्या उमेदवारीवर फरक पडू शकतो असे मत मनोहर वाडेकर म्हणाले आहेत.याप्रकरणी खासदार अमोल कोल्हेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता अमोल कोल्हे हे देखील बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळेंप्रमाणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? हे महत्वाचे आहे.