बातमी 24तास ऑनलाईन चाकण (प्रतिनिधी )भाजपा पुणे जिल्हा सेवा (एन.जी.ओ) आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. प्रितम शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने, राज्य गोसेवा आयोग अध्यक्ष तथा एनजीओ संपर्कप्रमुख शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख यांच्या सहकार्याने ॲड. प्रितम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांच्या शिफारशी नुसार ॲड. प्रितम शिंदे यांची सेवा (एनजीओ) आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.जिल्ह्यातील सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, सांस्कृतिक संस्था यांची संख्या आणि औद्योगीक क्षेत्रातील सी.एस.आर फंडाचे वाटप पहाता अत्यंत महत्त्वाची जबाबदारी वरीष्ठ नेतृत्त्वाने ॲड. शिंदे यांना सोपविल्याबाबत तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी सांगितले.
एन-जी-ओ.ला सेवा कार्यात आवश्यक ते मार्गदर्शन आणि कायदेशीर सल्ला देत भाजपाचा अंत्योदयाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या कायम प्रयत्नशील सहख्यावान्त राहणार असल्याचे ॲड.शिंदे यांनी सांगितले. ॲड. प्रितम शिंदे यांना चाकण शहर हातगाडी पथारी संघ (संस्थापक / सचिव), स्व.पत्रकार अनंतराव भोई प्रतिष्ठान (कायदेशीर सल्लागार), श्री साई लोकसेवा प्रतिष्ठान. (संस्थापक अध्यक्ष), छत्रपतीनगर मित्र मंडळ (कायदेशीर सल्लागार), महाराष्ट्र साहित्य त्रिमुर्ती मित्र मंडळ (माजी अध्यक्ष), महाराष्ट्र साहित्य परिषद (चाकण शाखा उपाध्यक्ष) यासह इतरही संस्थांमध्ये त्यांना कामांचा अनुभव आहे. ॲड. प्रितम शिंदे यांची नुकतीच नोटरी भारत सरकार पदीही निवड करण्यात आलेली आहे.