चाकण (वार्ताहर ) :- आगामी लोकसभेची निवडणूक लोकशाहीची सत्वपरीक्षा असून, संविंधान बासणात गुंडाळून भारतामध्ये अध्यक्षीय राजवट राबविण्याचा अजेंडा केंद्र सरकार करत असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी केला.
राजगुरुनगर येथे खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या,असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी केला.
यावेळी निखिल कविश्वर निरीक्षक खेड विधानसभा पृथ्वीराज पाटील प्रवक्ता पुणे जिल्हा काँग्रेस वंदना सातपुते सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस, अमोल दौंडकर सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस जमीर काझी, अध्यक्ष पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेल,चंद्रकांत गोरे अध्यक्ष पुणे जिल्हा किसान काँग्रेस, जया मोरे अध्यक्ष लीगल सेल पुणे जिल्हा, अनुराग जैद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड,अतिश मांजरे उपाध्यक्ष युवक काँग्रेस पुणे जिल्हा,सतीश राक्षे सभापती पंचायत समिती खेड,सुभाष होले अध्यक्ष किसान सेल काँग्रेस खेड,गिताबाई मांडेकर अध्यक्ष महिला काँग्रेस खेड, बाळासाहेब गायकवाड अध्यक्ष चाकण शहर काँग्रेस, दत्ता गोरे,ॲडव्होकेट गणेश सहाने अध्यक्ष युवक काँग्रेस खेड,निखिल थिगळे उपाध्यक्ष युवक काँग्रेस खेड,सुनील मिंडे सदस्य काँग्रेस कमिटी,धनेश म्हसे सचिव युवा काँग्रेस खेड,दीपक थिगळे,पंडित पवार, उपाध्यक्ष किसान सेल खेड,उमेश रानवडे आळंदी शहराध्यकक्ष , मयूर आगरकर आदि उपस्थित होते.आमदार जगताप पुढे बोलताना म्हणाले, ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद अथवा महानगरपालिके पर्यंत लोकनियुक्त ऐवजी शासन नियुक्त प्रतिनिधी नेमून लोकशाहीच्या अंगावरून बुलडोझर फिरवायचं काम शासनामार्फत सुरू आहे. असा प्रयोग नुकताच पुणे शहरात करण्यात आला आहे.दरम्यान, यावेळी ॲड कावेरी बंडू गुंजाळ -राळे, ॲड अभिजीत कड, मंगल मुकेश काळे, काजल होनगे, कृष्णाबाई कारले, विश्वनाथ गायकवाड, युवराज कोबल, तानाजी पारधी, सागर पाटीलबुवा दौंडकर, रमेश नेहरे, रामदास भिकाजी गोळे, तानाजी डांगले, रामभाऊ डांगले, सुरेश मोहन, अविनाश राळे, वैभव रामदास राळे, काळूराम कड, प्रवीण बेंडभर आदींनी जगताप यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल दौंडकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.