(प्रतिनिधी,अविनाश खराबी) दिनांक 22 जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अयोध्या येथील कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील ह भ प श्री शिवाजी महाराज नवल यांना निमंत्रण आलेला असून ते आयोध्याला रवाना झालेले आहेत.
आपल्या भारतीय संस्कृतीच्या आणि वारकरी सांप्रदायिक शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये खूप मोठे योगदान पूर्ण वेळ देऊन समाजामध्ये धर्म जागरण जागरण म्हणून काम केलेला आहे आणि ते स्वतः श्रीमद्भगवद्गीतेचे क्लास घेतात खूप विद्यार्थ्यांच्या कडून त्यांनी श्रीमद्भगवद्गीता मुखवर्गत करून घेतलेले आहे असे हे मूळचे जिल्हा अहमदनगर शेवगाव येथील असणारे शिवाजी महाराज नवल आळंदी येथे स्थायिक झालेल्या असून ते महाराष्ट्र प्रांताचे संस्कृती प्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत. आणि खूप मोठ्या योगदानामुळे त्यांना अयोध्या येथे श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण आलेले आहे.