(कल्पेश अ. भोई ) :सध्याच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया, व्यसधिनता यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे.यावर चाकण डॉक्टर असोसिएशन च्या माध्यमातून प्रबोधन व्हावे असे मत खेड चे आमदार दिलिप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.चाकण डॉक्टर असोसिएशनच्या नवनिर्वचित पदाधिकारी पदग्रहण समारंभ प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले हे होते. कामाच्या अति ताणामुळे सर्व डॉक्टर्स हे तणावग्रस्त असून त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता डॉक्टर असित अरगडे न्यायवैद्यक तज्ञ असून डॉक्टरांसाठी देश व राज्य पातळीवर काम करतात त्यांच्या या अनुभवाचा चाकण डॉक्टर असोसिएशनला निश्चितच फायदा होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी चाकण हार्ट फाउंडेशन चे ध्रुव कानपिळे,मोतीलाल सांकाला,डॉक्टर अविनाश अरगडे,रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, कालिदास वाडेकर,नितीन गोरे, राजेंद्र गोरे,प्रकाश खराबी, अभिमन्यू शेलार, डॉक्टर विजय खरमाटे,भगवान मेदनकर,अरुण जोरी यांच्यासह अनेक डॉक्टर्स व मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून विविध आजारांवर संशोधन झाले पाहिजे तसेच चाकण सारख्या औद्योगिक नगरीमध्ये सी.एस. आर. च्या माध्यमातून सी. एस. आर. ची स्थापना करावी असे प्रतिपादन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. डॉक्टरांनी गरीब रुग्णांबद्दल सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवली पाहिजे तसेच स्वतः सेवा देत असताना स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजनही केले पाहिजे त्याकरिता आर्थिक साक्षरता वर्गाचे आयोजन करावे असे त्यांनी यावेळी सुचविले. चाकण येथे डॉक्टर्स महिलांचा सहभाग लक्षणीय असून ही डॉक्टर असोसिएशन कुटुंबा सारखी असल्याचे कौतुक त्यांनी केले. चाकण व पंचक्रोशीतील सर्व पॅथीच्या तसेच सर्व स्पेशलिटीच्या डॉक्टरांची ही संघटना असून जवळपास 250 हून अधिक डॉक्टर्स यामध्ये नोंदणीकृत आहेत.अशी माहिती मावळते सचिव अमोल बेनके यांनी दिली. मावळते अध्यक्ष डॉक्टर संपत केदारे यांनी बोलताना मागील पाच वर्षात कोविड सारख्या आजारावर सक्षमपणे तोंड देत असताना डॉक्टर्स करिता मॅरेथॉन, क्रिकेट, फुटबॉल,सारखे खेळ तसेच विविध गुणदर्शन गणेशोत्सव शैक्षणिक व्याख्याने परिसंवाद सामाजिक उपक्रमांचा आढावा दिला.
आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर असित अरगडे म्हणाले की,डॉक्टरांसाठी चाललेल्या उपक्रमा व्यतिरिक्त त्यांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांवर असोसिएशन यापुढे काम करेल, रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबद्दल असलेले गैरसमज, रुग्णालयात येणाऱ्या बिला संदर्भात होणारे वाद-विवाद, नातेवाईकांचा होणारा उद्रेक आदी घटनांवर रुग्ण – डॉक्टर सुसंवाद घडविण्याकरता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व प्रशासन यांची समन्वय समिती असोसिएशनच्या माध्यमातून स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केल. तसेच रुग्णांकरिता विविध योजना,परवाना करिता एक खिडकी योजना, न्याय वैद्यक कृती समिती आदी योजनांची देखील त्यांनी यावेळी घोषणा केली. या प्रसंगी डॉ अजय चंदनवाले यांचा असोसिएशन च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी चाकण डॉक्टर्स असोसिएशन च्या ८ माजी अध्यक्षांचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी जाधव,लक्ष्मण राऊत तरआभार डॉ. प्रशांत शेलार यांनी मानले.