श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील श्रींच्या मंदिरांची पायाभरणी झाली त्या पायाभरणीची म्रुक्तीका व शरयू नदीचे जल घेऊन श्री विष्णू स्थळ किल्ले संग्रामदुर्ग चाकण येथे प्राचार्य राजू दिक्षित सर, किल्लेदार स्मारक प्रतिष्ठान व पतसंस्थेचे अध्यक्ष.ॲड.किरण झिंजुरके, यांचे शुक्रवार दि.19/01/2024 रोजी श्री संग्रामदुर्ग,चाकण येथे आगमन झाले.
चाकण मधील पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे पायाभरणीची म्रुक्तीका व शरयू नदीचे जलाचे स्वागत करण्यात आले.श्री संग्राम दुर्ग चाकण येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्या शरयू मातेचे पवित्र जलकलश व रामलला गर्भगृह भूमिपूजनातील पवित्र म्रुक्तीका पूजनाचा कार्यक्रम महंत परमपूज्य स्वामी श्रीपाद अवधूतजी यांचे शुभहस्ते सोमवार दि.22/01/2024 रोजी श्री संग्रामदुर्ग,चाकण.ता.खेड.जि.पुणे. येथे होणार आहे.
या निमित्त भजन, दीपोत्सव श्रीविष्णू अभिषेक,प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीस पुष्पवृष्टी असा कार्यक्रम आयोजित केला आहे .तरी सर्व प्रभू श्रीराम भक्तांनी दुपारी ४.०० पासून रात्री९.०० वाजेपर्यंत उपस्थित राहून सहभाग घ्यावा व ७५० वर्षानंतर रामललाचा वनवास संपल्याचा आनंद साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.