हायवा व कारच्या अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार ठार तर दोन जखमी.

Share This News

बातमी 24तास (जुन्नर /आनंद कांबळे )

बनकरफाटा जुन्नर मार्गावर गणपती फाट्याच्या पुढील एस कॉर्नरवर हायवाची व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदारा गंभीर जखमी होऊन ठार झाले असून दोन महसुलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. सदर अपघात शनिवारी दुपारी २.३० वाजे दरम्यान बनकरफाटा जुन्नर मार्गावर पांगरीमाथ्याच्या मागे एस कॉर्नरवर झाला असून यात निवडणूक नायब तहसीलदार अनंथा बनाजी गवारी वय ५२ हे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.तर विजय खार्तोडे वय.४८ हे दोघे गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे वय ३५ (सर्व रा.जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे)हे किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी महसुल अधिकारी होंडा सिटी कार बनकरफाट्या कडुन जुन्नरच्या दिशेने जात होती त्याच वेळी पांगरीमाथ्या कडुन बनकरफाट्याच्या दिशेने हायवा येत होता.एस कॉर्नर वर होंडा सिटी कारची व हायवाची समोरासमोर धडक होऊन कारमधील गवारी व खर्तोडे गंभीर जखमी झाले.ही धडक इतकी भिषण होती की कार जी जुन्नरकडे चालली होती तीचे फिरून परत बनकरफाटा बाजूला तोंड झाले होते.या अपघाताची माहिती मिळताच ओतूर चे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किशोर बर्डे व इतरांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.तसेच अपघाता ग्रस्त वाहने मार्गावर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.या अपघातातील गंभीर जखमी गवारी यांना पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy