आळंदी:श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर नुकताच तीन नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली. या नेमणुका होण्याच्या क्रियेच्या पूर्वीपासूनच आळंदी ग्रामस्थांचा नवीन नियुक्ती हि ग्रामस्थ प्रतिनिधि न घेता करण्यास विरोध होता. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची घटना ही जुनी आहे आणि त्यात बदल केला जात नाही, यासह इतर बरेच मुद्दे आक्षेपार्ह आहेत. मुळात पूर्वी पदभार संपलेल्या विश्वस्तांना पदभार वाढवून देण्यात आला आणि नवीन पदभार वाढून मिळालेले विश्वस्त येणाऱ्या नवीन विश्वस्तांची नेमणूक करतात ही कृतीच मुळात चुकीची आहे त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ प्रतिनिधी हा देवस्थान विश्वस्त कमिटीवर असावा अशी आग्रही मागणी यापूर्वीपासून आळंदीकर ग्रामस्थ करत आहेत. आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पात्रता आणि कागदपत्र पूर्तता करूनही त्या सर्व तक्रारी आणि अर्जांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तसेच स्थानिक ग्रामस्थ हा विश्वस्त असावा यासाठी तथाकथित व्यवस्थापकीय मंडळाचा विरोध असने याचे कारणच काय? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्या अनुषंगाने आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या तक्रारीची आणि मागणीची दखल न घेतल्याने येणाऱ्या 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या काळात निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व व्यवहार बंद करण्याचा इशारा आळंदीकर ग्रामस्थांनी देत आळंदी बंदची हाक पुकारली आहे. सर्व व्यापारी आणि ग्रामस्थांनी सहभागी होत सहकार्य करावे. असे आवाहन ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येत आहे. दिनांक 3 /12 /2023 रोजी श्री ज्ञानदर्शन धर्मशाळा येथे बोलावण्यात आलेल्या समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशासन योग्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरले तर ऐन कार्तिक वारीमध्ये ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे. या मीटिंगच्या वेळी बबनराव कुऱ्हाडे,डी डी भोसले, हभप चैतन्य महाराज लोंढे, रोहिदास तापकीर, शंकरराव कुऱ्हाडे,नंदकुमार कुऱ्हाडे, राहुल चितळकर, सुरेश वडगावकर ,रामदास भोसले ,रमेश गोगावले, अशोक उमरगेकर,अशोक रंधवे,आनंदराव मुंगसे,संजय घुंडरे, सचिन गिलबिले, किरण येळवंडे,शिरीष कारेकर, विठ्ठल घुंडरे,संकेत वाघमारे,रमेश जाधव, श्रीधर घुंडरे,राहुल चव्हाण,सुरेश घुंडरे, वारकरी, विद्यार्थी, युवक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीचा योग्य विचार न झाल्यास यात्रा काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे,