वृत्त सेवा : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहरा जवळ असणाऱ्या जीवन मंगल कार्यालय समोर मालवाहू ट्रक आणि टेम्पो ट्रेक्स क्रूझरच्या आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातातील तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. टेम्पो ट्रेक्स क्रुझर गाडीने ट्रक ला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृतातील तीन जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय ५०) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि.नाशिक अशी मृतांची नावं आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर धुक्याच प्रमाण अधिक होते. त्यात वेगात असणाऱ्या क्रुझर गाडीने पुढे चाललेल्या मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा गाडीतच अडकून जागेवरच मृत्यू झाला आहे.धुकं अधिक असल्याने क्रूझरच्या ड्रायव्हरला पुढे जाणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली.या अपघातात क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रक च्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.