बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल( प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
आळंदी/कार्तिक वारी 2023 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस कर्मचारी यात्रा यशस्वीरिते पार पाडण्यासाठी अहोरात्र सज्ज होत आहेत. अशातच आळंदी नगर परिषदेच्या विविध प्रकारच्या अनधिकृत आणि कंत्राटी पद्धतीने कामगार असल्याचे सांगत प्रमुख अधिकारी असल्याचा वाव आणत गैर प्रकार होताना मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना हस्तेपर हस्ते तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अशी चर्चा होत होती. त्यात बरेचशे कंत्राटी पद्धतीने असलेले कामगार हे नगर परिषदेचे अधिकारी असल्यासारखा वावर करत आळंदी नगर परिषदेच्या दारात उभे नेहमीच ऊभे राहतात त्यात शिपाई चां ड्रेस कोड अंगावर नसतो आणि नगरपरिषदेत काम काय आहे याची बाहेरच्या बाहेर चौकशी करत अर्थ मार्जिन करत असल्याचे वेळोवेळी दिसून येत होते. संबंधित गरजवंतास काम होण्याच्या दृष्टीने विश्वास ठेवावा लागत होता. पैकी काही कर्मचारी शिपाई चा ड्रेस न घालत कडक खादीचे कपडे घालून नगरपरिषदेत येतात. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होत सदर स्वयंघोषित पुढारी आहेत हे ते विसरून जात आपल्या कामाचा पाढा वाचतात आणि अवाजवी रक्कम मागणी केली तरी दिली जाते अशी चर्चा वेळोवेळी होत होती. त्यातच आळंदी नगर परिषदेवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यातील बरेचसे सेवानिवृत्त वयातही केस काळे करून येतात अशाही चर्चा आहे. आणि आता कार्तिकी वारी 2023 यामध्ये याचा वाईट अनुभव यायला नको म्हणून प्रशासनाने योग्य ती दखल आणि काळजी घेतलेली आहे. कोरोना काळातही विविध लस तसेच नाशवंत वस्तूंचा व्यापार म्हणजेच भाजीपाला यासाठी बसणाऱ्या व्यक्तींकडूनही अशाच प्रमाणे पैशाची लूट केली गेली होती. या सर्व बाबींचा आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पूर्वीच अभ्यास केलेला दिसून येत आहे. आणि त्यामुळेच कार्तिकी वारीमध्ये नगर परिषदेने नेमून दिलेल्या यात्रा कर वसुली अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणाकडेही आळंदी यात्रा शुल्क भरू नये असं नोटीस जारी केलेले आहे. यामध्ये आळंदी यात्रा कर वसुली अधिकारी जे नेमून दिलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी हि बडेजाव पणा करत व्यापारी यांना नगरपरिषद कर्मचारी असल्याचे भासवून यात्रा कर शुल्काची मागणी केली. तर ते भरू नये त्याबाबत तक्रार करावी आणि आळंदी नगर परिषदेने नेमलेल्या अधिकृत व्यक्तीलाच यात्रा कर शुल्क द्यावी. इतर कोणी जर तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. याबाबतची तक्रार आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करावी अशी नोटीस आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जाहीर केलेली आहे. सर्व स्थानिक आणि इतर व्यापाऱ्यांनी याची नोंद घेत याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केली जात असून. सतर्क राहून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे.