पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने  पत्नी आणि पुतण्याला घातल्या गोळ्या आणि केली आत्महत्या घरात आढळून आले मृतावस्थेत

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी,अतिश मांजरे पाटील ) पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अमरावती पोलिस दलाचे सहायक पोलिस आयुक्त हे पुणे शहरातील बाणेर भागात त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त भारत शेखा गायकवाड (५७) हे अमरावती येथे कार्यरत असून त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात राहत होते. ते शनिवारी रजेवर शहरात आले होते.

भारत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांचा खून झाला आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेले भारत गायकवाड यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला होते. गायकवाड यांनी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास गोळीबार केल्याने परिसरात आवाज आला. पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यात जागीच मरण पावले. त्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःलाही संपवले. गेल्या शनिवारी सुट्टीवर आले होते. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या आहेत.दरम्यान त्यांनी हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील बाणेर भागात त्यांचे कुटुंब रहात होते. ते अमरावती येथे नेमणुकीला होते. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात रहात होते. पोलीस दलात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? त्यांनी पत्नी, पुतण्याला संपवून आत्महत्या का केली? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने आता तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy