चाकण नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

Share This News

बातमी 24तास

चाकण (प्रतिनिधी)चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ईव्हीएम मशीन ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था, मतमोजणी टेबलांची मांडणी, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन व्यवस्था तसेच वीजपुरवठ्याची पर्यायी सोय करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतमोजणी टेबल ठेवण्यात येणार असून, उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना ओळखपत्रासह प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी दरम्यान परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी व शिस्त पाळण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण चाकण शहराचे लक्ष लागले असून, नगराध्यक्ष पदावर कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकालानंतर शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.प्रशासनाने नागरिकांना व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे व कायदा-सुव्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे तसेच चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy