
बातमी 24तास ( वृत्त सेवा ) चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा प्रचाराचे वातावरणाने जोर धरला आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांनी तसेच सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांनी प्रचाराचा धुराळा उडवीला आहे.
आज प्रभाग नं ११ माणिक चौक श्रीराम मंदिर येथून प्रचारास जोरदार सुरवात झाली. यावेळी प्रभागातील गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितिनभाऊ गोरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, प्रभागातील उमेदवार योगेश देशमुख आणि स्मिता जाधव यांच्या सह मोठया संख्यने युवा, महिला आणि नागरिक प्रचारात सामील झाले.

प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा समोर ठेऊन आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत आश्वसन दिले.
नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्व.मा.आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी विविध झालेली विकास कामे,चाकण साठी पिण्याचे पाणी राखीव करणे, नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर, जाचक करवाढ रद्द, मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्यमान आरोग्य कार्ड, लाडकीh बहीण योजना यामुळे नागरिक उस्फुर्त पणे शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
