
बातमी 24तास ( वृत्त सेवा ) संपूर्ण ज़िल्हयाचे लक्ष लागलेल्या चाकण नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये उद्या शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (दि.२८) दुपारी दोन वाजता होणार आहे.
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्यासह सर्व प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उपस्थित राहणार आहेत.या सभेला खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
चाकण नगरपरिषदेचे निवडणूक वातावरण तापू लागले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. शहरातील विविध विकासकामांचा आढावा,निवडणूक दिशा आणि उमेदवारांना दिला जाणारा पाठिंबा या विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या नेत्याची सभा होण्याची ही पहिलीच वेळ असून आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारी ठरेल, असे बोलले जात आहे.चाकण शहरातील शिवसैनिकांमध्येही या सभेबाबत उत्सुकता असून मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहील,असा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केला आहे.