
बातमी 24तास,
चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सचिन कदम सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग , संजय सोळंके वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत चाकण पोलीस स्टेशन, सुभाष चौक- बाजारपेठ- जामा मशीद – धाडगेआळी- गोल्डन चौक- खंडोबा मंदिर – खंडोबा माळ – महात्मा फुले नगर – अण्णाभाऊ साठे चौक – नेहरू चौक – महात्मा फुले चौक- नगरपरिषद चौक, चाकण पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आला.

यावेळी चाकण, आळंदी, भोसरी एमआयडीसी, चिखली, महाळुंगे एमआयडीसी, दिघी अशा पोलीस ठाणे कडील सर्व मिळून एकूण 15 पोलीस अधिकारी व 80 पोलीस अंमलदार तसेच 01 आरसीपी पथक असे उपस्थित होते.