
बातमी 24तास ( वृत्त सेवा ) शिवसेना ( शिंदे गट )पक्षाच्या चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचाराचा तसेच प्रभाग 3 अ चे उमेदवार सुवर्णा शाम राक्षे, प्रभाग क्र. 3 ब चे उमेदवार अनिल लोहकरे प्रभाग क्र. 6 अ चे उमेदवार स्वाती संतोष लेंडघर, प्रभाग क्र. 6 ब चे उमेदवार हर्षद लेंडघर यांच्या प्रचाराचा दौरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितिनभाऊ गोरे यांच्या समवेत करण्यात आला.
यावेळी मोठयाप्रमाणावर युवा, महिला, नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत स्व.मा.आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्ण यांना मदत, आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून देऊन कुटूंबाना आधार देणे या सर्व योजना आपण नागरिकापर्यंत पोहचू शकलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मोठयाप्रमाणावर निधी उपलब्ध होऊन चाकणचा शास्वत विकास करण्याचा विश्वास मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवार यांना धनुष्यबाण समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
