
बातमी 24तास
चाकण (अतिश मेटे) चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारी अर्जांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. दिवसभरात सदस्य पदासाठी तब्बल ६८ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी १ अर्ज दाखल झाला.यापूर्वी दाखल झालेल्या अर्जांसह आजपर्यंत सदस्य पदासाठी एकूण १६६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण ५ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
भाग्यश्री विवेक वाडेकर राष्ट्रवादी आणि अपक्ष, मनीषा सुरेश गोरे शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण, संगीता आनंद गायकवाड काँग्रेस, हर्षदा घनश्याम चौधरी ,भाजपा,अनिता अनिकेत गोरे अपक्ष, या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. नगरपरिषद निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले असून विविध राजकीय पक्ष, आघाड्या आणि अपक्ष इच्छुकांतर्फे उमेदवारी दाखल करण्याची लगबग आज दिवसभर सुरू होती. अर्ज छाननी, मागे घेणे आणि अंतिम लढतीत कोण कोण उतरतील याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील टप्प्यात अर्जांची छाननी, अंतिम यादी आणि प्रचाराचा रणसंग्राम सुरू होणार आहे. शहरातील वाढती राजकीय हालचाल पाहता यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.