पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद मतदारसंघात विजयसिंह शिंदे पाटील यांची प्रचारात आघाडी

Share This News

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी 24तास

चाकण (वृत्त सेवा ): जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव तर्फे खेड मतदारसंघात विजयसिंह शिंदे पाटील यांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘खेळ मांडला पैठणीचा’ आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमांची मोठी चर्चा आहे. या कार्यक्रमांच्या अंतिम सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी त्यांनी “विकास हा माझा मुख्य अजेंडा असून मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न प्राधान्याने सोडवणार” असे सांगितले.

महिला आरक्षणामुळे जुना मतदारसंघ बदलल्यानंतर नवीन मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही सर्व पक्षीय सहभागातून लढवणार असून, ग्रामविकास, पाणीटंचाई, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा या विषयांवर त्यांनी थेट चर्चा केली.प्रचारातील प्रमुख मुद्दे• खराब रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते• ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण• महिलांसाठी व युवकांसाठी स्वयंपूर्णतेचे उपक्रम• प्राथमिक आरोग्य सुविधा व शाळांची गुणवत्ता वाढ• कृषी पायाभूत सुविधांचा विकासकोरोनाकाळात अन्नधन्य, औषधे, आणि पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे मदत यामुळे त्यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढला. दावडी, कण्हेरसर आदी गावांतून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

गेली 10–15 वर्षे मतदारसंघात विविध विकासकामे केल्यामुळे त्यांची ओळख काम करणारा नेता म्हणून झाली आहे. तसेच एसीझेड परिसरात स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्नही कौतुकास्पद ठरले.सभांमध्ये ते नेहमीच म्हणतात, “मी तुमच्यासाठीच राजकारणात आलो आहे. प्रत्येक अडचण माझीच जबाबदारी.” विरोधक मैदानात असले तरी शिंदे पाटील यांची जनसंपर्क मोहीम अधिक प्रभावी ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.निवडणुकीला काही दिवस शिल्लक असल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून विजयसिंह शिंदे पाटील यांची आघाडी ठळकपणे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy