
बातमी 24तास
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे )
खेड तालुक्यातील येलवाडी येथील सरपंच रणजित गाडे भावी जि प अध्यक्ष पे गणेश बोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; 100 KVK क्षमतेचे नवीन रोहित्र आणि स्वतंत्र वीज वाहिनी कार्यान्वित व पुजन करण्यात आली.येलवाडी परिसरातील नागरिकांना अनेक महिन्यांपासून त्रस्त करणाऱ्या वीज समस्यांवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. परिसरातील झपाट्याने वाढणारी वीजेची मागणी आणि जुनी झालेली वीज वितरण यंत्रणा यामुळे दररोज ४ ते ५ तास वीज खंडित होत होती. मात्र, गणेश बोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कायम विजेची समस्या मिटली लोड होता ट्रांसफार्मर वरती येलवाडी गावातील रणजित गाडे गणेश बोंत्रे त्यांनी वेळोवेळी पाठपुरवठा करून तिथे नवीन ट्रांसफार्मर मंजूर केला आणि ट्रांसफार्मर मंजूर करण्यासाठी खुप विज वितरण महामंडळ पाठपुरावा केला अखेर यश मिळाले .या दुसऱ्या रोहीत्र मुळे गावकऱ्यांना परिसरातील विज पुरवठा चांगल्याप्रकारे लाभ मिळणार आहे.यावेळी सरपंच रणजित गाडे भावि जि. प . अध्यक्ष पै गणेश बोत्रै उपसरपंच विक्रम बोत्रै वैभव गाडे संतोष बोत्रे विज वितरण महामंडळ कर्मचारी उपस्थित होते.