आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तीताई जाधव युथ फाऊंडेशन यांच्यावतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांची दिवाळी झाली गोड.

Share This News

बातमी 24तास

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे)

एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मौजे लाखी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे दिवाळीचा फराळ व किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.तसेच पुरग्रस्त भागातील घरांची पडझड झालेली पाहणी करून लोकांना धीर देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेची पाणी करून मुलांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आले. या छोट्याशा उपक्रमातून गोरगरीब मुलांचा आनंद द्विगुणीत झालेला पाहायला मिळाला यावेळी आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त मदत देण्याचे कार्य लवकरच केले जाईल अशी लोकांना ग्वाही देऊन लोकांना एक मानसिक आधार देण्याचं सत्कार्य करण्यात आले**हा उपक्रम राबवताना कीर्तीताई मारुती जाधव फाउंडेशन व सहकुटुंब सहपरिवार समवेत संपूर्ण गावकरी समवेत मारुती जाधव, सरपंच दादा बारस्कर,पोलीस पाटील, नारायण पाटील, निवृत्त मेजर मनोहर रामलिंग पिंगळे,दादा पिंगळे,अनिल ढवळे,पोलीस पाटील अंगद बारस्कर,ज्ञानेश्वर उमाप,कुणाल पळसकर,अभी जाधव,दत्ता धर्मे,आशिष हिंगे, सुशांत आवाळे, संतोष जाधव, गणपत जाधव,फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्तीताई जाधव सह संपूर्ण गावकरी उपस्थित होते.

शेवटी गावातील सरपंच दादा बारस्कर पोलीस पाटील नारायण पाटील व ग्रामस्थ यांनी कीर्तीताई जाधव फाउंडेशनचे सर्व टीमसह आभार व्यक्त केले व गरजेचे वेळी आम्हाला मदत मिळाली म्हणून समस्त गावकऱ्यांनी जड अंतकरणाने भरलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy