एक हात मदतीचा मराठवाडा पुरग्रसतांना रवाना दमदार आमदार पै.महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून तळवडे परिसरातील मदतीचा हात

Share This News

बातमी 24तास

(पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे) तळवडे येथील सौ.अस्मिताताई अनिल भालेकर (खजिनदार महिला मोर्चा पिं. चिं.शहर भाजपा) व दमदार आमदार पै महेशदादा लांडगे मित्र परिवार तळवडे रुपीनगर यांच्या वतीने मराठवाडा जि.बीड ता.आष्टी १.शिरापुर २.टाकळी ३.धिरडी या गावांना पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली आहे.

लाखोंच्या किमतीचे अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू, अंथरुण-पांघरुण व त शालेय साहित्य रवाना करण्यात आले. या , मदतसामग्रीत:-तांदूळ, गहू, साखर, तेल, रवा, पोहे, तूर डाळ, मूगडाळ, साबण ) यांसह दैनंदिन वापरातील आवश्यक ना वस्तूंचा समावेश होता. या साहित्याचे किट तयार करून पूरग्रस्त भागात पाठवण्यात आले. श्री.पै.आमदार महेश लांडगे यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते.

या आवाहनाला तळवडे रुपीनगर सहयोगनगर त्रिवेणीनगर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एक ट्रकहून अधिक धान्यस्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, वस्त्रे आणि देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, आमदार महेशं लांडगे यांनी मदत संकलन मोहिमे दरम्यान ५१ ट्रकहून अधिक धान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. सौ.अस्मिताताई भालेकर एक सामाजिक संवेदनशीलतेचे आणि एकतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. संकटाच्या काळात समाज एकत्र आला तर कोणतेही आव्हान सहज पार करता येते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचला आहे.यावेळी व सामाजिक कार्यकर्ते व सर्व आमदार महेशदादा लांडगे मित्र परिवार तळवडे परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy