
बातमी 24तास
अतिश मेटे (चाकण प्रतिनिधी ) :- चाकण औद्योगिक नगरीतील सॅफरॉन सिटी सोसायटीमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चांदण्यांच्या प्रकाशात हास्य-विनोद, संगीत, आणि सामूहिक मैफिलीने वातावरण भारावून गेले.सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या सॅफरॉन सिटी सोसायटीत यापूर्वी गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, किल्ले स्पर्धा, डान्स स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, नुकतेच गणपती मंदिर उभारून सोसायटीने धार्मिकतेचा व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे.कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, प्रवीण गोरे, रोनक गोरे, राहुल गोरे, उद्योगपती गुलाब शेवकारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शेवकारी, चेतन कवटकर, निलेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सॅफरॉन सिटीचे चेअरमन संतोष आरु, किरण पवार, राजेश पवार, निखिल शिंगोटे, अंगत राऊत, गणेश मेंगडे , नवदीप नाईक , योगेश भामरे, शुभांगी बोरलेपवार, माधुरी खुठले, सुजाता आरु तसेच सोसायटीतील सर्व सभासद, महिला भगिनी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.या प्रसंगी नितीन गोरे यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे एकता, बांधिलकी आणि संस्कृतीचे संवर्धन होते,” असे मत व्यक्त केले.चेअरमन संतोष आरु यांनी उपस्थितांचे आभार मानत, पुढील काळातही अशाच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे सोसायटी एक आदर्श उदाहरण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकदिलाने परिश्रम घेतले. कोजागिरी पौर्णिमेच्या या सोहळ्याने सोसायटीत ऐक्य, आनंद आणि सांस्कृतिक बंध अधिक दृढ झाले.