
बातमी 24तास
मुंबई – महा मुंबई मेट्रो कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी राजगुरूनगर (खेड) येथील ॲडव्होकेट निलेश बाळासाहेब आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रशांत मस्के यांनी ही अधिकृत घोषणा केली.कामगार हक्क, औद्योगिक कायदे आणि कामगार कल्याणाच्या क्षेत्रात ॲडव्होकेट निलेश आंधळे यांना प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये कामगारांच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद केला आहे. त्यांच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे संघटनेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि न्यायाधिष्ठिततेची जोड मिळणार आहे.संघटनेचे सदस्य, पदाधिकारी आणि कामगार बंधू-भगिनींनी या नियुक्तीचे स्वागत केले असून, आगामी काळात संघटनेच्या हितासाठी ॲडव्होकेट आंधळे यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

