
बातमी 24तास
(प्रतिनिधी, सम्राट राऊत) चाकण एमआयडीसी परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी ही स्थानिक उद्योजक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांची दुरवस्था, अव्यवस्थित वाहतूक व्यवस्था आणि वाढत्या वाहनांमुळे दररोज तासन्तास वेळ वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.वाहतूक कोंडीबाबत चाकण एमआयडीसी नागरिक व उद्योजक आक्रमक होत आम्हांला आता फक्त आश्वासने नकोत कृती हवी आहे. असे म्हणत आपले मत बैठकीत मांडले.
आश्वासनांवर नाही, कृतीवर भर द्यावाअसे म्हणत चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजक व नागरिकांनी वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे. “आम्हाला आता फक्त आश्वासने नकोत, ठोस कृती हवी आहे,” असा एकमुखी निर्धार झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी चाकण एमआयडीसी मधील 200 हून अधिक कंपन्यांचे मालक व पदाधिकारी या महा-बैठकीत सहभागी झाले.
यावेळी एकमुखाने ठराव घेण्यात आला. वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक कंपनी शेकडो हजारो कामगारांसह पायी धडक मोर्चामध्ये सहभागी होईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
का उभा राहतोय हा मोर्चा? गेल्या अनेक वर्षांपासून चाकण MIDC व पंचक्रोशीतील नागरिक ट्रॅफिकच्या समस्येला कंटाळले आहेत.PMRDA, NHAI, MIDC, MSIDC, MSEDCL, PWD यांसारख्या जबाबदार संस्था केवळ फाईल हलवण्यात गुंतल्या आहेत.मुख्यमंत्री यांनी पालकत्व दिलेल्या PMRDA या संस्थेने ठोस पावले उचलली नाहीत.DP प्लॅनवरील रस्ते कागदावरच राहिले प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही.रस्त्यांचे जाळे, फ्लायओव्हर, बायपास, व पर्यायी मार्ग यांच्या विलंबामुळे उद्योगांचे नुकसान, कामगारांची हालअपेष्टा आणि नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.
आमच्या ठोस मागण्या
1. PMRDA DP प्लॅनमधील रस्त्यांची तात्काळ अंमलबजावणी.
2. NHAI व PWD यांनी तातडीने फ्लायओव्हर व चौक सुधारणा सुरू करावी.
3. MIDC अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरण युद्धपातळीवर करावी.
4. MSIDC, MIDC व इतर संस्था यांनी परस्पर जबाबदारी ढकलणे थांबवून समन्वयाने काम करावे.
आमची आक्रमक भूमिका आजपर्यंत संयम दाखवला, पण आता तो संपला आहे. चाकण व पंचक्रोशीतील लाखो नागरिक आणि हजारो कामगारांचे आयुष्य ट्रॅफिकच्या जंजाळामुळे ठप्प झाले आहे. उद्योगांचे उत्पादन व आर्थिक चक्र धोक्यात आले आहे. त्यामुळे, PMRDAच्या दारात आम्ही धडक मोर्चा नेऊ.
हा मोर्चा फक्त निदर्शन नसेल तर तो जनतेचा इशारा असेल – “काम केले नाही तर आम्ही शांत बसणार नाही!” “चाकणच्या ट्रॅफिक मुक्तीसाठी सरकारला आता जबाबदार धरले जाईल.” चाकणकरांचे हे आंदोलन केवळ ट्रॅफिकविरोधी नाही, तर जीवनावश्यक हक्कांसाठीची लढाई आहे. आजचा शंखनाद हा निर्णायक लढाईचा प्रारंभ आहे.

