
बातमी 24तास
(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे) आज, गुरुवारी २५ रोजी दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो, जो आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि हा रंग माँ कुष्मांडाला समर्पित आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगांचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. यामागे प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व असून ते देवीच्या वेगवेगळ्या रूपांशी जोडलेले आहे.

पिवळ्या रंगाचे महत्त्व आनंद आणि सकारात्मकताः पिवळा रंग आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.संपत्ती आणि स्नेहः काही परंपरांनुसार, पिवळा रंग संपत्ती आणि स्नेहाचे प्रतीक देखील आहे.
देवीचे रूपः पिवळा रंग ‘अष्टभुजा’ देवीचा खास रंग मानला जातो, जी माँ कुष्मांडा म्हणून ओळखली जाते आणि तिची पूजा या दिवशी केली जाते.नवरात्रीतील रंगांचे महत्त्व नवदुर्गेचे स्वरूपः नवरात्रीत नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे, जी देवीच्या विविध शक्ती दर्शवते.सकारात्मक ऊर्जा: रंगांचा वापर उत्सव अधिक उत्साही बनवतो आणि सकारात्मक ऊर्जा व भक्तीची भावना वाढवतो.पारंपरिक महत्त्वः हे रंग देवीच्या पूजा-अर्चा आणि सणाचे वातावरण अधिक सुंदर बनवतात.नऊ दिवसाचे नवरंग महिला त्याच्या साड्या परिधान करतात आजचा रंग पिवळा असून देहू नगरपंचायत च्या महिलांनी आनंद व्यक्त करून नवरात्र उत्सव साजरा करतात यावेळी देहू नगराध्यक्ष सौ पूजाताई अमोल दिवटे, कार्यालय अधीक्षक प्रियांका कदम ,आरोग्य विभाग प्रमुख कविता पाटील, रेश्मा गाडे,वर्षा टिळेकर , नितल देवकर, आशा मोरे, आरती काळोखे,निशा येळवंडे,स्वाती गाडेकर,सविता चव्हाण, गीता सौदे,सुनीता टाक सर्व उपस्थित होते.

