चाकण शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर; नागरिक त्रस्त

Share This News

वेळेत पगार न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्यास केली मनाई

बातमी 24तास

चाकण ( कल्पेश अ. भोई) : महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे चाकण शहर आज कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक वसाहतींचा विस्तार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून योग्य नियोजनाचा अभाव यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येते. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार न केल्याने ठेकेदाराकडील सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्यास असमर्थता दर्शवली,त्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये बहुतांशी ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आलेले दिसले यानंतर चाकण नगर परिषदेच्या वतीने कचरा ताबडतोब कचरा उचलून नेण्यात आला.

दरम्यान चाकण नगर परिषद कडून सदर ठेकेदारास कामाच्या मोबदला धनादेश देण्यात बिलंब झाला त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होऊ शकले नाही. त्या कारणास्तव कामगारांकडून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा उचला गेला नसल्याने शहरात बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले. यावर नगरपरिषदेकडून काल संध्याकाळी धनादेश देण्यात आला असून त्यांच्याकडून उद्यापासून कचरा उचलण्यास सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले.दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर ओला व सुका कचरा तयार होतो. घरगुती कचऱ्याबरोबरच हॉटेल, कारखाने, बाजारपेठा आणि विविध कार्यालयांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र त्याच्या संकलनासाठी उपलब्ध गाड्या व मनुष्यबळ अपुरे असल्याने अनेक भागांत रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागी कचऱ्याचे ढीग पडून राहतात.पावसाळ्यात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते, डास-माशा वाढतात आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. काही ठिकाणी कचरा जाळून टाकला जात असल्याने वायूप्रदूषणाचा प्रश्नही तीव्र झाला आहे. परिणामी, श्वसनाचे आजार, त्वचारोग व डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींचा धोका वाढला आहे.कचरा व्यवस्थापनासाठी घराघरातून कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असतानाही नागरिकांत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. स्थानिक प्रशासनाकडून या बाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच, कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून ओला कचरा खत निर्मितीसाठी वापरणे आणि सुका कचरा पुनर्वापरासाठी पाठवणे हा दीर्घकालीन उपाय असू शकतो.

चाकण हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर असून येथील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या CSR (सामाजिक उत्तरदायित्व) अंतर्गत विविध उपक्रम राबवतात. त्याचप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी या कंपन्यांनी आर्थिक तसेच तांत्रिक सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.शहरातील स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy