
बातमी 24तास,
चाकण ( अतिश मेटे) : जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिराने आपला ७१ वा वर्धापन दिन प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा केला. हा दिवस विशेष ठरण्याचे कारण म्हणजे शाळेच्या इतिहासात प्रथमच वर्धापन दिन सोहळा औपचारिकरित्या साजरा करण्यात आला.सन १९५४ रोजी जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. जयवंतराव उर्फ दादासाहेब जगताप यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने ही शाळा स्थापन केली. शाळेच्या स्थापनेत ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या संस्थापकांना आजच्या सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागया सोहळ्यास शाळेच्या स्थापनेच्या काळातील अनेक जुने विद्यार्थी उपस्थित राहिले. यामध्ये माजी आमदार रामभाऊ कांडगे, शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी श्रीमती सुन्नाप्पा सिकीलकर, तसेच रामभाऊ बारवकर, दत्तात्रय गोरे, तुकाराम गोरे, सदाशिव मेदनकर, मुक्ताजी नाणेकर, सल्लाउद्दीन काझी, लक्ष्मण सोरटे, चंद्रकांत सुतार, चंद्रकांत जगनाडे, मच्छिंद्रनाथ जगनाडे, आनंदराव येळवंडे, हिरामण सोनवणे, हुसेनभाई सिकिलकर, संजय वाडेकर यांचा समावेश होता.त्याचबरोबर सन २००० पूर्वी दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थीही उपस्थित होते. यात रवींद्र काकडे, श्रीमती रुपाली काकडे, सुलाभ पठारे, राजेश कांडगे, दिनेश उबाळे व प्रशांत खेडकर यांचा समावेश होता.
माजी शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती – माजी शिक्षक डी. के. ठुबे, मुरलीधर पाबळकर, माजी प्राचार्य दिलीप गोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अमोघ धाडगे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय जगनाडे उपस्थित होते.
देणगी जाहीरया वेळी बोलताना माजी आमदार रामभाऊ कांडगे म्हणाले, “त्या काळी दादासाहेब जगताप यांनी शाळा स्थापन केली नसती तर आम्हाला शिकण्यासाठी दूर जावे लागले असते. ही शाळा आमच्यासाठी भाग्याची ठरली आणि आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.”यावेळी त्यांनी रु.१ लाखांची देणगी जाहीर केली. तसेच रामभाऊ बारवकर यांनी रु.२५,०००, मुक्ताजी नाणेकर यांनी रु.२५,००० तर संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांनी जगताप कुटुंबियांच्या वतीने रु.१ लाखाची देणगी जाहीर केली.कार्यक्रमाची रूपरेषा• प्रास्ताविक : प्राचार्य अनिल ठुबे• संस्थेचा व जगताप कुटुंबाचा इतिहास : जनरल सेक्रेटरी सुभाष जावळे•
मनोगत : मुक्ताजी नाणेकर• आभारप्रदर्शन : राजेंद्र खरमाटे• सूत्रसंचालन : रिना बनकरउपस्थितीया कार्यक्रमास सर्व संस्थेचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सुमारे ३५०० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचा ७१ वा वर्धापन दिन हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी तर ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.
