
बातमी 24तास
राजगुरूनगर (अनिल राक्षे) खेड तालुक्यातील श्री क्षेत्र गुळाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आधुनिक संगणक कक्षाची भेट मिळाली आहे. मनेकचंद नेमचंद विश्वस्त संस्था, मुंबई यांच्या वतीने श्री किरीट सुंदरलाल शेठ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा संगणक कक्ष प्रदान करण्यात आला.या वेळी उद्घाटक म्हणून अदिरा सेक्युरिटी रिसर्च चे संपत जरे व आदिरा जरे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत, तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील मुलांनीही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये व रोजगाराच्या संधींमध्ये मागे राहू नये, असे उद्गार काढले.कार्यक्रमास सरपंच माऊलीशेठ ढेरंगे, उपसरपंच सर्जेराव पिंगळे, माजी सरपंच संदीप पिंगळे, उद्योजक माणिकशेठ भोगाडे, पोलीस पाटील मंगेश राक्षे, संगणक तज्ञ संदीप पिंगळे, केंद्रप्रमुख कैलास लोखंडे, उपसभापती संदीप ढेरंगे, उपाध्यक्ष मुरलीधर ढेरंगे, विश्वस्त भिकाजी अण्णा ढेरंगे, चेअरमन अलकाताई खळदकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश खळदकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रवीण कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक बाळासाहेब पिंगळे यांनी केले. या संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
