पांगरीत शिक्षक दिनानिमित्त “समाजवन – मियावाकी जंगल” प्रकल्पाचा शुभारंभ

Share This News

बातमी 24तास,राजगुरूनगर प्रतिनिधी(अनिल राक्षे)खेड तालुक्यातील पांगरी गावात शिक्षकदिनाचे औचित्य साधून जेएसडब्ल्यू फाउंडेशन, जेएसडब्ल्यूएमआय व मुंबई माता बाल संगोपन संस्था यांच्या उपस्थितीत अभिनव “समाजवन – मियावाकी जंगल प्रकल्प” राबविण्यात आला. गावाजवळील गायरानामध्ये तब्बल अडीच गुंठ्यात १२५ प्रकारची ५५० देशी झाडे लावून हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली.या प्रकल्पात केवळ देशी जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली असून गावाची हिरवाई, शुद्ध हवा व पर्यावरणाचे संवर्धन हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.* समाजवन प्रकल्पाचे महत्त्वहवेतला कार्बन शोषून हवामान सुधारणाशुद्ध ऑक्सिजनची निर्मितीप्रदूषण नियंत्रणपाणी साठवण वाढ व मातीची धूप रोखणेस्थानिक जैवविविधतेचे संरक्षणहा प्रकल्प डॉ. अकीरा मियावाकी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतीवर आधारित असून, अवघ्या १० वर्षांत दाट जंगल उभे राहणार आहे. पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे.

कार्यक्रमास जेएसडब्ल्यू लिमिटेड चे अधिकारी सुनील शर्मा, प्रशांत आचार्य, मनीष चौधरी, महादेव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद घोलप, उद्योजक गणेश शितोळे, पोलीस पाटील रवींद्र भोसले, तसेच मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. समन्वयक म्हणून सुरज गौतम, शर्मिला सांडभोर, स्वाती शिंदे, श्वेता गायकवाड, अशोक मांजरे, प्रशांत पारधी यांनी कार्यभार सांभाळला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुर्वे यांनी केले तर आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संदीप जाधव यांनी मानले. पांगरी ग्रामस्थांच्या सहभागातून उभे राहिलेले हे “समाजवन” खेड तालुक्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy