जिल्ह्यातील मुख्याध्यापक- शिक्षक – शिक्षकेतर यांना गुणवंत व आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .

Share This News

बातमी 24तास

प्रतिनिधी: ( संजय बोरकर) आजच्या बदलत्या पिढीचा विचार करता शिक्षकांनीही बदल स्विकारल्याशिवाय आजची पिढी घडणार नाही. असे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. आमदार आसगावकर हे खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक- शिक्षक- शिक्षकेतर संघ यांच्या वतीने रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय खेड येथे घेण्यात आलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. जिल्हयातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी , मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत असगावकर , माजी आमदार दिलीप मोहिते , जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख ,पुणे माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर ,पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे, प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, जिल्हा संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामथे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, शिक्षक संघटनेचे दादासाहेब गवारे, खेड कॉलेजचे प्राचार्य शिरीष पिंगळे,संयुक्त संघटनेचे अध्यक्ष उत्तम पोटवडे,खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व संयुक्त संघटनेचे कार्याध्यक्ष संजय बोरकर, संयुक्त संघाचे सचिव रामदास रेटवडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास पवार,विश्वस्त मधुकर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबाजी काळे म्हणाले की खेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतरांचा गौरव करून एक उत्तम आदर्श खेड तालुक्यातील या संघटनेने ठेवला आहे. खेड तालुक्यातील शाळांमधील येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच विविध सुविधा पुरवण्यासाठी नेहमी सहकार्य करण्यात येईल.कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राज्य महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची भाषणे झाली. यावेळी सात जणांना “राजगुरू रत्न”, एक विषय तज्ञ, ३४ मुख्याध्यापक, ११४ शिक्षक व १३ सेवक अशा एकूण १६९ जणांना सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्याचेशिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे , गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले , डायट प्राचार्य डॉ. राजेश बनकर, डायटचे अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर ,ठाणेचे अधीक्षक संभाजी पवार, जिल्हा सहसचिव उत्तम पोटवडे यांना राजगुरू रत्न म्हणून गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश माळशिरसकर, बाळासाहेब वायकर,विलास आदलिंगे,सतिश देवरे,काशिनाथ पोखरकर,,लतिफ शेख ,अरविंद गवळे ,निलीम कदम ,उत्तम खेसे,भालेराव कडपाटील,रविंद्र चौधरी पाटील,सुनिल कड आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy