बातमी 24तास,राजगुरूनगर, (अनिल राक्षे) समाजातील गरजूंना मदतीचा हात देत माऊली सेवा प्रतिष्ठान, राजगुरूनगर यांच्या वतीने खेड तालुक्यातील वेताळे गावच्या उपळवाडीतील ठाकरवस्तीत मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून तब्बल ८० कुटुंबांना आधार मिळाला.राजगुरूनगर येथील नागरिकांकडून गोळा करण्यात येणारे लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे वापरण्यायोग्य कपडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून योग्य पद्धतीने वर्गीकृत केले जातात. जमा झालेल्या कपड्यांपैकी चांगल्या स्थितीतील कपडे या ठिकाणी वितरित करण्यात आले. कपडे मिळाल्यावर ठाकरवाडीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला.या उपक्रमासाठी वेताळे गावचे माजी सरपंच बळीराम पारधी आणि मानसी ढमाले यांनी विशेष पुढाकार घेतला.यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे, बाबाजी कातोरे, हर्षवर्धन शिंदे, सविता लोंढे, दिलीप राक्षे, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली शिंदे, अर्चना ढमाले तसेच कडुसचे माजी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले यांच्या उपस्थितीत कपडे वाटपाचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले.माऊली सेवा प्रतिष्ठानचा हा सामाजिक उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून, खऱ्या अर्थाने “आनंद देण्यातच आहे” याची जाणीव नागरिकांना करून देणारा ठरला आहे.