
बातमी 24तास
आळंदी प्रतिनिधी: आरीफ शेख आळंदी/ गेले तीन-चार दिवस पडणाऱ्या सततंधार पावसामुळे भामा आसखेड धरण 99 टक्के च्या पुढे भरले आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा विसर्ग सुरू केला आहे. तसेच सातत्याने होणारा पावसाचा ओघ सुरू राहिल्याने आळंदी ची इंद्रायणी तुडूंब भरुन वाहत आहे.परिणामी आळंदीच्या जुन्या दगडी बांधकाम असलेला पुल आणि आळंदीतून चाकण कडे जाणारा नवीन पूल असे दोन्ही आळंदी पूल नागरिकांना रहदारी व वाहतुकीसाठी बंद केले आहेत. नगरपरिषद आणि आळंदी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नागरिकांना दक्षता घेण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.

आळंदी नदीच्या पुराच्या परिस्थितीमुळे ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाण्यात वाढ झाली आहे नदीकाठचा परिसर पर्यायने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर जवळील भाग पाण्याखाली आला आहे. माऊली च्या दर्शनासाठी जाणारी दर्शन बारी,भक्ती सोपानपुल,पूर्ण पाण्यात बुडाल्या आहेत. नागरिकांनी पुलाचा वापर करू नये अशी सूचना देणारे आवाहन पत्र आळंदी नगर परिषदेने जाहीर केले आहे. आळंदी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग आळंदी पोलीस नदीला चारी बाजूने रहदारीसाठी असणाऱ्या रस्त्यांवर तैनात असून. नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. आळंदी पोलीस स्टेशन यांच्याकडून आळंदीला जोडणाऱ्या दोन्ही फुलांच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडून एका पत्रकाद्वारे नदी किनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे जीवित हानी होऊ नये यासाठी काळजी घेत सदरचा नदीकाठचा परिसर त्वरित मोकळा करण्याचे सूचना देण्यात आलेले आहेत. भामा आसखेड धरण पूर्णपणे भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सुरू असून जुना दगडी पूल आळंदी नगर परिषदेसमोर आहे. त्याची कालमर्यादा समाप्त झाल्याचे पत्र नगर परिषदेत प्राप्त असून त्याबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या स्थितीमध्ये दोन पूल आळंदी नगर परिषदेच्या कडून पुण्याकडे जाण्यासाठी कार्यरत आहेत तरीही दक्षता म्हणून आळंदी नगरपरिषद आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्याकडून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवून नागरिकांना रहदारी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे नागरिकांनी विनाकारण प्रवास या पुलावरून करू नये याची दक्षता घेत सदर परिसरातील नदीकिनारी असणारे सर्व संवेदनशील भाग ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी भरण्यात आलेले आहे त्यासाठी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलेल आहे.