
बातमी 24तास
चाकण(प्रतिनिधी,अतिश मेटे) चाकण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे ६ वाजता अचानक दौरा केला. या वेळी त्यांच्या सोबत पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, पीएमआरडीए अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांनी वाहतूक कोंडी निवारणासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी तळेगाव–शिक्रापूर रस्ता ४ लेन ऐवजी ६ लेन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच चाकणला लवकरच महानगरपालिका दर्जा देण्यात येणार असून, त्याद्वारे शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश देत त्यांनी नगरपरिषद व संबंधित विभागांना कार्यवाही गतीमान करण्यास सांगितले. पुणे–नाशिक एलीवेटेड मार्ग करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “चाकणकरांनी आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे, सहनशीलता दाखवली आहे. मात्र आता हा त्रास लवकरच कमी होईल, यासाठी सरकार व प्रशासन कटिबद्ध आहे.”असे अजित पवार यांनी सांगितले.