
बातमी 24तास खेड / आळंदी (प्रतिनिधी,अरिफभाई शेख ) श्रीरामपूर अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयातील कामकाज करत असताना ॲड.दिलीप यांच्यावर विरुद्ध बाजूच्या पक्षकाराकडून न्यायालयात हल्ला करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून राजगुरुनगर वकील बारा असोसिएशनच्या वतीने आज सोमवारच्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच या घटनेचा निषेध नोंदवत खेड तालुक्यातील प्रशासकीय मुख्य कार्यालय असणारे प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यांच्यावर मोर्च्याच्या स्वरूपाने निषेच्या घोषणा देत निषेध रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड,वैभव कर्वे. उपाध्यक्ष ॲड,कोंडिभाऊ कोबल. असोसिएशनच्या उपाध्यक्षा स्वरूपा कोतवाल /वाडेकर, सचिव ॲड.शुभम गाडगे,सचिव ॲड.नवनाथ कड असोसिएशनच्या खजिनदार शारदा राक्षे, लोकल ऑडिटर ॲड.केदार गुरव.सदस्य ॲड.सुरज राळे, सदस्य ॲड केदार गुरव.सदस्य,ॲड.संकेत वाघमारे सदस्य,ॲड.दीपक थीगळे.वकील बार असोसिएशनच्यासदस्या,ॲड.सिद्धीका लांडगे.सीनियर वकील ॲड.बी.एम सांडभोर.सीनियर वकील अँड.पोपट तांबे.सीनियर वकील ॲड.मुकुंद आवटे.खेड तालुका नोटरी असोसिएशन अध्यक्ष ॲड राक्षे.सीनियर वकील ॲड.कोटबागी मॅडम. राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या सर्व सुमारे 600 ते 700 सदस्यांनी या निषेध मोर्चामध्ये सहभाग घेतला.
आठवड्यातील पहिला दिवस असतानाही नेहमीची असणारी गर्दीची वर्दळ न राहता संपूर्ण कोर्टामध्ये आज शुकशुकाट होता. वकील संरक्षण कायदा मंजूर करावा तसेच या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत. राजगुरुनगर बार असोसिएशन सरकारी कामात अडथळा साठी वापरण्यात येणारे कलम 353 प्रमाणे वकिलांवरील होणाऱ्या हल्ल्यांबाबत वरील कलमाच्या अनुषंगाने विचार केला जावा यासाठी राज्यपाल महाराष्ट्र शासन यांना पत्र व्यवहार करणार आहे. या हल्ल्याचा निषेध करत. वकील महिला सदस्य तसेच पुरुष वकील सदस्य यांनी राजगुरुनगर शहरांमध्ये मोठी रॅली काढली.
दरम्यान या वकिलांच्या बंदच्या आंदोलनामुळे त्याचा परिणाम कोर्टाच्या कामकाजावर झाल्याचे दिसून आले. बऱ्याच प्रमाणात सर्वच कोर्टामध्ये कामकाज ठप्प झाल्याचे दिसत होते. भविष्यामध्ये हल्ले होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाला जाग येणार आहे की नाही असा मोठा आक्रोश वकील महिला सदस्यांचे मार्फत करण्यात आला. वकील म्हणजे ऑफिसर ऑफ द कोर्ट आहेत म्हणजेच क्लास वन ऑफिसरचा दर्जा प्राप्त असणारा वकील पेशी असता नाही अशा प्रकारचे भ्याड आणले या पुढील काळात सहन केले जाणार नाही अशा प्रकारचे मनोगतही यावेळी व्यक्त करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये वकिलांवरील होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या बाबत सडेतोड भूमिका होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असा सर्व वकील सदस्य यांनी पावित्रा घेतलेला आहे. प्रांत अधिकारी अनिल दौंड यांनी निवेदन स्वीकार करत महाराष्ट्र शासनाला वकिलांच्या तीव्र भावना बाबत कळवणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. दरम्यान वकिलांचे कामकाज चालू नसले तरी कोर्ट परिसरामध्ये असणाऱ्या वकील बांधवांच्या हाताच्या दंडावर काळीपट्टी बांधून संपूर्ण दिवस कोर्टाच्या परिसरात सदर वकील दिसून आले.