
बातमी 24तास,प्रतिनिधी आरिफ शेख
आळंदी/वाहतूक कोंडी मध्ये चाकणच्या जागतिक वाहतूक कोंडी नंतर आळंदी चा नंबर लागतो की काय ? अशी परिस्थिती आहे.आळंदीमध्ये नित्याचे वाहतूक कोंडी आता होऊ लागली आहे.आळंदी दर्शनाला येणारे कमी मात्र पर्यायी रस्ता म्हणून वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर पोलिसांचा सिसेमारा चुकवण्यासाठी कंपनीची अवजड वाहने मिळेल त्या रस्त्याने लपछपत जातात. याचा आळंदीतील मूळ नागरिक यांना मोठा मनस्ताप होतो. इलाज असूनही रोग भयंकर अशी परिस्थिती होऊन बसली आहे.पूर्वी सूचना केले प्रमाणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सोहळ्याच्या वेळीअवजड वाहनांना पूर्णपणे आळंदीत बंदी करून सात आठ दिवस वाहने बाहेरून वळवली होती.त्यामुळे आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न सोहळा असूनही वाहतूक सुरळीत होती. याबाबत सोशल मीडियावरही सूचना करण्यात आल्या.मात्र 750 वा सोहळा समाप्त झाल्यानंतर पुन्हा वर्दळ गावठाण ठिकाणी वाढली.दिघी-आळंदी वाहतूक पोलीस जागोजागी तक्रारीची दखल घेतात.प्रसंगी गाड्या उचलून नेऊन दंड ही करतात.मात्र अवजड वाहनांची बंदी ही कायमस्वरूपी असावी अशी नागरिकांची मानसिकता आहे.पोलिसांनी अवघड वाहनांची कायमस्वरूपी बंदी करायला हवी.ज्यामुळे आळंदी मध्ये वाहतुकीची गर्दी कमी राहील तसेच आळंदीतील पीसीएस कंपनी येथील बायपास वापर होतोय तसाच वापर वडगाव रोड येथे जाणाऱ्या अवजड वाहनांनी मरकळ मधून कोयाळी मार्गे वडगाव कडे जाण्यासाठी रस्त्याचा वापर केल्यास.कंपनी वाहतुकीच्या गाड्यांमुळे आळंदी शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लागू शकतो.कोयाळी मार्गे असणारा वडगाव कडे जाणारा रस्ता हा वडगाव एमआयडीसी तसेच मरकळ एमआयडीसीसाठी वापरला जावा याव्यतिरिक्त वाहने आळंदीत आली तर मात्र दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना प्राप्त झाल्या आळंदीतील वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लागेल. अशी नागरिकांची मागणी आहे. वडगाव रोड येथे पूर्वी सातत्याने अपघात होत असतात यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीं ही मृत्युमुखी पडलेले आहेत. या सर्वांचा विचार करता अवघड वाणी यांच्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशत कोत्तर सोहळ्याच्या वेळी केलेली नियमावली वापरत आळंदीतील वाहतुकीचा प्रश्न कायमचा मार्गी काढण्यास आळंदीकर ग्रामस्थ नागरिक मागणी करत आहे.