
गुरुपौर्णिमे निमित्त 35 वर्षे सेवा करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचा सत्कार. ॲड,पोपटराव तांबे सीनियर लॉयर -2025 पुरस्काराने सन्मानित
बातमी 24तास
प्रतिनिधी आरीफ शेख : राजगुरुनगर/आळंदी:- राजगुरुनगर वकील बार असोसिएशन कडून गुरुपौर्णिमेनिमित्त राजगुरुनगर न्यायालयाच्या प्रांगणामध्ये गुरुपूजन सोहळा साजरा करण्यात आला. राजगुरुनगर येथे सुमारे 35 वर्ष वकिली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वयोवृद्ध मान्यवरांचा सत्कार आयोजन राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.वैभव कर्वे व कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी न्यायाधीश सय्यद साहेब, न्यायाधीश बारवकर साहेब,न्यायाधीश पोळ साहेब,न्यायाधीश होडावडेकर साहेब,. न्यायाधीश नाईक नवरे साहेब, न्यायाधीश गुप्ता साहेब, या मान्यवरांच्या हस्ते सुमारे 26 मान्यवर वकिलांचा राजगुरुनगर वकिल बार असो.च्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यकारणी कडून करण्यात आलेल्या नियोजनाचे सर्व जेष्ठ वकिलांनी कौतुक केले. त्याचबरोबर राजगुरुनगर तालुक्यामध्ये आपल्या वकिली व्यवसायाने सर्वांचे मने जिंकणारे ॲड.पोपटराव तांबे यांना महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल यांचे वतीने “सीनियर लॉयर 2025 “या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबाबत त्यांचा विशेष सन्मान राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲड.वैभव कर्वे व कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्व वकील बांधवांना गुलाब पुष्प देऊन गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष मनोगत मध्ये न्यायाधीश सय्यद साहेब ,यांनी सर्व कार्यकारणीला सदिच्छा शुभेच्छा देत सत्करार्थी चे ही अभिनंदन केले. त्याचबरोबर न्यायाधीश सय्यद साहेब., यांनी वकील बांधवांच्या माध्यमातून येणारे काळामध्ये वकील बांधवांनी मेडिएटरच्या माध्यमातून केस निकाली काढून अशीलांचा वेळ आणि पैसा वाचवण्याला पर्यायाने कोर्टाची कार्यालयीन वेळ वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याचे मार्गदर्शन मेहरबान न्यायाधीश सय्यद साहेबांच्या वतीने करण्यात आले. राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या सर्व महिला सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर एडवोकेट नाईकरे साहेब यांचे महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशन अध्यक्ष पदावर नियुक्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. शंकर कोबल यांनी केले. तसेच गुरु पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या सर्व वकील महिला पुरुष सदस्य तसेच वयोवृद्ध वकील सदस्य यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल राजगुरुनगर बार वकील असोसिएशन अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव कर्वे यांनी व कार्यकारिणीने सर्वांचे आभार मानले आहेत.