
बातमी 24तास
प्रतिनिधि आरिफ भाई शेख.
खेड/राजगुरुनगर बार वकील असोसिएशन नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीने विविध मुद्द्यांवर एकत्र येत आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करून ठराव घेण्यात आला असल्याची माहिती राजगुरुनगर बार असोसिएशन अध्यक्ष अँड.वैभव कर्वे यांनी दिली आहे. आळंदी फाटा,चाकण आंबेठाण चौक,खेड या ठिकाणी जीव घेणे वाहतूक कोंडी होते अनेकांची बळी गेलेत. आणि आणि नागरिक मात्र प्रचंड त्रस्त आहे. वर्षानुवर्ष जणू या वाहतूक कोंडीचा आजारच पुणे नाशिक हायवे ला झालेला आहे. यावर त्रस्त होऊन राजगुरुनगर बार वकील असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.वैभव कर्वे यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तसेच बरेच वर्ष पुणे नाशिक हायवे राजगुरुनगर चाकण या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रचंड संताप नागरिकांमध्ये आहे याबाबतही त्यांनी विस्तृत विचार मांडले.भारतीय नागरिक, आणि संविधान रक्षक म्हणून माझा ते कर्तव्य आहे. मला कुठल्याही पक्षाचा,कुठल्याही प्रतिनिधीचा, हेवा दावा करायचा नाही.मात्र यामुळे नागरिकांना पर्यायाने हॉस्पिटलमध्ये नेल्या जाणाऱ्या आजारी पेशंटना ही हाकनक जीव गमवावा लागत आहे.याची प्रचंड चीड असल्याचे राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड वैभव कर्वे यांनी व्यक्त केली.
राजगुरुनगर बार असोसिएशन ने सर्वानुमते ठराव करत उच्च न्यायालयात जगजाहीर असणाऱ्या चाकण राजगुरुनगर वाहतूक कोंडीची याचिका दाखल करण्याचा प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे. त्याबाबत सविस्तर वृत्त विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी दिले. वकीलबार असोसिएशनने बार रूममध्ये 3 जुलै रोजी बैठक घेऊन उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव मंजूर केला.
यावेळी जेष्ठविधीज्ञ सह सर्व वकील सदस्य उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष ॲड वैभव कर्वे.उपाध्यक्ष ॲड.शंकर कोबल सचिव ॲड.नवनाथ कड,माजी अध्यक्ष अँड.अनिल राक्षे,ज्येष्ठ वकील सी.एस. सांडभोर.ॲड.सुभाष करंडे ॲड.मनीषा पवळे ॲड.विक्रम कड,ॲड.महेश जांबुकर,ॲड.अरुण मुळूक ॲड.रुकसाना पठाण,ॲड.आरती सैद ,ॲड.मीनानाथ साबळे,ॲड.दीपक थीगळे ॲड.करण कांबळे ॲड.सागर मैद आदी सदस्य उपस्थित होते.