बातमी 24तास, (वृत्त सेवा) महाळुंगे पोलीस ठाणे आवारात एकूण २९ बेवारस वाहने मिळून आलेली आहेत.त्याबाबतची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वेबसाईट (http://pcpc.gov.in/) यावर प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर वाहने ज्या मालकांचे असतील त्यांनी गाडीचे कागदपत्र सादर करुन ओळख पटवून घेवून जावेत.ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत यातील बेवारस वाहने गुन्ह्यामध्ये असतील त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन मोन. ७०२८५३५३२३/९९७०४०८०५० यावर संपर्क साधावा.तसेच ज्या मालकांचा गाड्या असतील त्यांनीही सदर नंबर वरती संपर्क साधावा.सदर बेवारस वाहना बाबत १५ दिवसामध्ये कोणी मालकी हक्क न दाखविल्यास सदर गाड्यांचा कायदेशिर पध्दतीने लिलाव करुन येणारी रक्कम सरकार जमा केली जाईल त्यानंतर कोणाची सबब ऐकून घेतली जाणार नाही. सदरची वाहने ज्या मालकांची असतील त्यांनी गाडीची ओळख पटववू न मुळ कागदपत्र सादर करून सदर बिनधनी वाहनांचा १५ दिवसात मालकी हक्क न दाखविल्यास गाडयांचा कायदेशीर लिलाव करून रक्कम कोषागारात भरली जाईल याची नोंद घ्यावी. गाड्याबाबत महाळुंगे पोलीस ठाणे, ता. खेड, जि.पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी केले आहे.