आळंदी ग्रामस्थांच्या पोलीस स्टेशन वरील ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनास जाग, खासगी वारकरी संस्थे ची चौकशी होणार

Share This News

बातमी24तास(प्रतिनिधी आरीफभाई शेख )

श्री तीर्थक्षेत्र आळंदी येथे दिनांक 4 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या वेळी एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत बारा वर्षे अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाला होता.पोलिसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली,मात्र आळंदीच्या नावाची बदनामी यामुळे आळंदीकर ग्रामस्थ मात्र प्रचंड संतापलेले होते.वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे,आळंदीचे नाव कलंकित होत आहे.त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावाचा व्यापारासाठी उपयोग केला जातो.आळंदी देवाची की लग्नाची म्हणायची याबाबतही तरुण ग्रामस्थांमध्ये तीव्र नापसंती,नाराजीचा सूर होता. ज्ञान दर्शन धर्म शाळेमध्ये ग्रामस्थ आळंदीकर यांची बैठक संपन्न झाल्यानंतर बैठकीतून उठून थेट पोलीस स्टेशन गाठत ठिय्या आंदोलन सुरू झाले.

ग्रामस्थांचा संताप अनावर होता.आरोपीवर कारवाई झाली त्याबद्दल दुमत नाही परंतु वारंवार होणाऱ्या घटना आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचार,यामुळे खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंदच करा, तसेच या महाराजांना माऊलींवर खरंच प्रेम आहे, त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये संस्था चालवून तेथेच परमार्थ करावा.मात्र आळंदीत आता खाजगी वारकरी संस्था नकोच या भूमिका घेत आळंदीकर प्रचंड संतापले होते.आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू झाले.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडल -१ येथून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आळंदीकरांनी ठिय्या आंदोलन थांबवले, मात्र कारवाई व्हायलाच हवी. हा आग्रह मात्र लावून धरला होता.त्यानंतर आळंदी पोलीस स्टेशन येथे शासकीय वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर महिला व बालकल्याण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.त्यामध्ये वसतीगृहासाठीचे असणाऱ्या शासकीय नियमांचे पालन करत सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्थांचे,धर्मदाय आयुक्त कडे नोंदणी असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्व संस्थांची कसून चौकशी केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या अध्यादेशाप्रमाणे व्यवस्था आहे की नाही,या नियमावली ते बसतात की नाही याबाबतही तपासणी केली जाणार असून संशयित तसेच आरोप असणाऱ्या संस्थांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान खेड बार कौन्सिल वकील संघटनेने आळंदीतील अत्याचार करणाऱ्या नराधमाचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतल्याने कोर्टाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला होता स्वतः कोर्टाने विनंती करू नये वकीलपत्र घ्यायला कोणी पुढे येत नव्हते. वकील एकजुटीचा खेड तालुक्यातील हा महत्त्वाचा निर्णय होता.त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराच्या सातत्याने घडणाऱ्या घटना याबाबत पोलीस खाते सतर्क झाले असून, तक्रारी आल्यास कुठलीही खाजगी संस्था सुटणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.मात्र यामध्ये आळंदीकर ग्रामस्थांचा आंदोलनाचा मोठा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येत अन्यायकारक चाललेल्या सुमारे पाच सहा वर्षापासूनच्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.श्री तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावाचे रक्षण करण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ एकवटलेत, येणाऱ्या काळामध्ये आळंदीकर म्हणून कोणीही बदनामीकारक कृत्य केल्यास,त्याला मात्र त्याचा जाब विचारला जाईल अशी परिस्थिती आळंदी करांच्या एकजुटीच्या निर्णयाने सध्या तरी दिसून येत आहे. श्री तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये सुमारे 165 च्या वर संस्था आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये एका विद्यार्थ्याकडून 15 ते 30 हजार रुपयांची रक्कम घेतली जाते,त्याचबरोबर माझा मुलगा वारकरी शिक्षणाचे धडे घेतो यासाठी आई-वडीलही मोठ्या प्रमाणात धनधान्याची पूर्तता करत असतात, अपवाद वगळता काही जुन्या संस्थांचे मात्र चांगलं नाव लौकिक आहे योग्य शिक्षण वारकरी शिक्षणाचे योग्य धडे या शिक्षण संस्थेमध्ये दिले जातात मात्र नंतरच्या काळात झालेल्या खाजगी शिक्षण संस्थांमुळे आळंदीच्या बदनामीला मोठे पेव फुटले आहे. यामध्ये काही संस्था सोडल्यास इतर लोकांनी मात्र या गोष्टीचा धंदा मांडला आहे,त्याचबरोबर दादागिरी ही केली जाते,या अशा बऱ्याच घटना आळंदीकरांच्या कानावर आहेत. काही खाजगी शिक्षण संस्था चालवणारे संताची वाणी वापरत नाहीत तर त्यांच्या वाणीमध्ये अहंकाराचा दर्प हि जाणवतो,मात्र मुलांना दिलेली गैरवर्तणुकीची वागणूक. त्याचबरोबर आई-वडिलांना कुठलीही गोष्ट कळवायची नाही यासाठी असलेल्या धाक यामुळे हिरमुसलेले चिमुरडी मुलं याचाही अनुभव आळंदीकर ग्रामस्थांनी वेळोवेळी घेतलेला आहे. यातूनच आळंदी करांच्या या निर्णयामुळे घुमसटलेली अत्याचारित मुले मोकळा श्वास घेतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy