बातमी 24तास चाकण (प्रतिनिधी ) सध्या व्यावसायिक सर्वच क्षेत्राना महागाईच्या झळा बसत आहेत. वर्षभरात प्रॉपर्टी, लाईट बिल, पाणीपट्टी दरात झालेली प्रचंड दरवाढ, वाढलेले घरभाडे, आदी कारणांमुळे केस, दाढीच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय श्री संत सेना महाराज नाभिक समाज चाकण व चाकण परिसर विकास संघ चाकण नाभिक समाजाने घेतला आहे.
दिनांक १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला ‘कात्री’ लागणार आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ही दरवाढ लागू होणार आहे.अलीकडच्या काळात सलून इंडस्ट्रीमधील (salon Industry) वेगवेगळे ब्रंड जे यापूर्वी फक्त मेट्रो सिटीमध्ये काम करायचे ते सर्व छोट्या-छोट्या शहरांसह ग्रामीण भागामध्ये आपले हातपाय पसरत आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील पारंपरिक व्यावसायिकांनाही आपल्या व्यवसायामध्व प्रचंड गुंतवणूक करावी लागत आहे.यामुळे या सगळ्याचा परिणाम सलून व्यवसायामध्ये दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही,या पार्वभूमीवर झालेल्या नाभिक समाजाच्या बैठकीत ही दरवाढ करण्याचा निर्णय झाला.प्चाकण शहर अध्यक्ष सचिन राऊत,उपाध्यक्ष योगेश शेलार, सचिव योगेश राऊत अध्यक्ष यांच्यावतीने हे दर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नोकरीच्या निमित्ताने शहरात येणारा जो लोकांचा ओघ आहे, त्या मंडळींना शहरातील अत्याधुनिक सलूनमध्ये मिळत असलेल्या सुविधा गावातही मिळाव्यात, अशी अपेक्षा असते. सलूनसाठी लागणारे सर्व साहित्य शहरातूनच खरेदी करावे लागते. त्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.त्यामुळे दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे चाकण शहराध्यक्ष सचिन राऊत यांनी सांगितले. यावेळी सहउपाध्यक्ष अख्तरअली हनिफ शेख,कार्याध्यक्ष वसंत राऊत,सहकार्याध्यक्ष नंदकुमार आढाव,खजिनदार रविराज राऊत,सहसचिव सुनिल वाईकर,सदस्य मच्छिंद्र राऊत,सदस्य कमलेश राऊतमहिला सदस्या सौ.हेमाताई बाळासाहेब शेलार यांच्यासह चाकण,खराबवाडी, कडाचीवाडी,वाघजाई नगर,बालाजी नगर, नाणेकरवाडी, रासे,भोसे, आंबेठाण रोड,चिंबळी, मोई,निघोजे, कुरुळी.परिसरातील नाभिक बांधव उपस्थित होते.नवीन दर पत्रक पुढीलप्रमाणे :स्टाईल कटिंग 100 च्या पुढे साधी कटिंग -100 पासून पुढेदाढी 70दाढी कोरणे 80जेल कलर 200लेबर चार्ज -100+ कलर लावने.हेड मसाज100फेसियल500 पासून फुढे ब्लीच – 300 पासून पुढेDTan 300 च्या पुढे हेयर स्पा – 500 पासून पुढे मुलींची कटिंग -150 पाचुन पुढे.असे नवीन दरपत्रक असणार आहे.त्यामुळे कमी दरात ग्राहकांना सेवा पुरविणे अवघड होत आहे. त्यामुळे एक जानेवारी २०२५ पासून चाकण शहर आणि परिसरातील सर्व सलून व्यावसायिकांनी आपले कटींग, दाढी, मसाजचे दर वाढविण्याचा निर्णय धेतला आहे. नवीन वर्षापासून सरासरी दरात वाढ करण्यात आली असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे,