बातमी 24तास (प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
आळंदी (दि. 26) अखिल भारतीय मराठा महा संघाला 125 व्या वर्षांमध्ये पदार्पण होत असताना महाराष्ट्राच्या राज्यभरामध्ये त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ म्हणून श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वरी मंदिरात संत पूजनाने करण्यात आला त्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील कबीर मठाचे मठाधिपती ह भ प चैतन्य महाराज कबीर यांच्याकडे संत पूजन गौरव समिती आळंदीचे स्वागत अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी सदर जबाबदारी दिली होती.आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सदर कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर नंदकुमार कुऱ्हाडे पाटील संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून तर आळंदीकर ग्रामस्थ यांची कार्यक्रमाची संयोजन समिती म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये ह भ प संजय दादा घुंडरे पाटील., अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा.तसेच हभप माऊली महाराज फुरसुंगी कर यांचे विचार विनिमयाने आळंदीकर ग्रामस्थांची संयोजन समितीचे गठित करण्यात आली.त्यामध्ये आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील.,माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर. माजी विरोधी पक्ष नेते डी.डी. भोसले पाटील.,माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले माजी उपनगराध्यक्ष वासुदेव आप्पा घुंडरे पाटिल.माजी उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे पाटील. शशिकांत राजे जाधव.,तुषार दादा घुंडरे पाटील. माजी नगरसेवक रमेश गोगावले., पद्मराज रानवडे. माजी नगरसेवक अविनाश तापकीर., सौरभ गव्हाणे..यांच्या समवेत आळंदीकरांची संत पूजन गौरव समिती गठीत करण्यात आली होती.त्याचबरोबर सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगराव गायकवाड साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार तसेच पुणे शहराचे सुपुत्र मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांचे प्रमुख अतिथी म्हणून नियोजन करण्यात आले होते.अखिल भारतीय मराठा महा संघ संयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते., तसेच विशेष परिश्रम घेणारे बाबूवाहन शेंडगे.अध्यक्ष, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान, बीड. यांचा मोलाचा वाटा होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प संतोषानंद शास्त्री महाराज आळंदी. यांनी करत 125 संत पुजनाचे महत्त्व, आमच्या सर्वांचे एकच संत शांतीब्रह्म मारुती बाबा कुऱ्हेकर यांचे संत पूजनाने होणार आहे. असे जाहीर करत मारुती बाबा कुरेकर यांचा सन्मान मध्ये 125 संतांचा सन्मान आहे असे सांगत प्रथम सन्मान होत असल्याचे सांगितले, त्यानंतर 125 महाराष्ट्रभरातून आलेल्या वारकरी सांप्रदायातील विशेष महाराज मंडळींचा कै.ऍड.शशिकांत पवार यांचे स्मारणार्थ मराठा भूषण पुरस्कार उल्लेखित मानचिन्ह देऊन,श्रीफळ,उपरणे, देत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजन समिती अध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी केली.
त्यानंतर आपल्या मनोगतामध्ये कबीर मठाचे ह भ प चैतन्य महाराज कबीर यांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म महत्त्व सांगत जातीभेद मानत कलुषित करणारे वातावरण वारकरी संप्रदाय मानत नसल्याचे आपल्या मनोगत सांगितले, त्याच तत्वाचा अवलंब अखिल भारतीय मराठा सेवा संघ करत आहे. आणि मराठी बोलतो तो मराठा याचा अभ्यास पूर्ण उल्लेख आपल्या मनोगत केला.पुण्याचे सुपुत्र केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार मुरलीधरजी मोहोळ यांना नियोजित कार्यक्रमामुळे येणे शक्य नव्हते,मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून शुभेच्छा पर संदेश देत केलेले मनोगत मोठ्या व्हिडिओ स्क्रीनवर प्रसारित करत शुभेच्छा दिल्या गेल्या.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ पिसाळ यांनी आभार मानले. तदनंतर महाराष्ट्रभरातून आलेल्या 125 संतांचा यथोचित सन्मान केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदाय एकादशीच्या निमित्त साधत अलंकापुरीच्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये उपस्थित होता.