भारतात बेकायदेशीर प्रवेश करून चाकण पोलीस ठाणेच्या हद्दीत वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरीकास चाकण तपास पथकाकडून अटक :- चाकण पोलिसांची कामगिरी

Share This News

बातमी 24तास(वृत्त सेवा )

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीक वसाहत असल्यामुळे शहरामधील काही भागामध्ये बांग्लादेशी नागरीक हे बेकायदेशिररित्या प्रवेश करून वास्तव्य करीत असल्याचे गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर . सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दहशतवाद विरोधी पथक (ATC) शाखा यांना गैररित्या वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरीकाबाबतची माहिती काढण्याचे आदेशीत केलेले होते.

त्यानुसार दिनांक २३/१२/२०२४ रोजी चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना चाकण पोलीस ठाणे कडील दहशतवाद विरोधी पथक (ATC) शाखेचे पोहवा/७०९ सुनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळली की, चाकण पोलीस ठाणे हद्दीतील आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंग मध्ये बांग्लादेशी नागरिक पुरुष व महिला असे सफाई कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / गणपत धायगुडे, पोहवा/७०९ शिंदे, पोशि/१९११ रेवन्नाथ खेडकर, पोशि/ २२४३ उध्दव गर्जे तसेच मपोशि/२३२३ उषा होले असे २ पंचासमक्ष खात्री केली असता वरील साईराज लॉजिंग मध्ये मिळालेल्या बातमीपनुसार एक पूरूष व महिला मिळून आले. त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यानी त्यांचे नाव टिंकु चौधरी, वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी, आधार कार्ड नं. ५४८१३१५३९६४८ व महिलेने तिचे नाव खादिजा खातुन, वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, Election Commission of India SWD8771297 दोन्ही रा. साईराज लॉजिंग, आळंदीफाटा, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे असे असल्याचे सांगितले.

वरील दोघांना अधिक चौकशी करीता पोलीस ठाण्यात आणले असता त्यांचेकडे असलेली ओळख पत्रांची तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पडताळणी केली असता सदरची ओळखपत्रे बनावट असल्याचे प्रथमदर्शनी खात्री झाल्याने विचारपूस केली असता त्यानी त्यानी त्यांचे मुळ वास्तव्याचे ठिकाण बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगून बांगलादेशातील नाव वरील आयडी प्रमाणे असल्याचे सांगुन तेथील पत्ता गाव छालचुरा, पोस्ट रानटिया, जिनेगती थाना, जिल्हा शेरपुर, राज्य ढाका, देश बांग्लादेश असे असल्याचे सांगितले. तत्काळ या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवून संबंधीत दोन्ही बांग्लादेशी नागरीकांवर बेकायदेशिररित्या भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असलेने त्यांचेवर चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ९३६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४). ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३ (५) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४(A) (b), १४ (C), पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) (सी) व पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३ (अ) या चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ९३४/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलमान्वये ३(अ)सदरची कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिंकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त मुख्यालय, विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोनि गुन्हे नाथा घार्गे, तपास पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि /गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक, नामदेव तलवाडे, पोहवा/सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सहा. फौजदार / राजू जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनिल भागवत, पोशि/बिक्कड, शरद खैरनार, किरण घोडके, उध्दव गर्जे, मपोशि/उषा होले, सरला ताजणे, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy