विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Share This News

बातमी24तास (वृत्त सेवा )

श्री एस पी देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारोह मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी अंकुशराव लांडगे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ‘ताल ‘ ‘द म्युझिक बीयॉन्ड द वर्ल्ड ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मा. एन .डी . पिंगळे , चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मा. कैलास चौधरी पाटील, इंटेलिजंट कँडेट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शिबू राजू, व डॉ.संजय सिंग इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, चिखली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाच्या सुमधुर गायनाने झाले.तसेच या कार्यक्रमाला फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे मा.किरण झिंजुरके , श्री. शिवाजी विद्यामंदिर चाकणचे माजी प्राचार्य मा. राजू दिक्षित , राष्ट्रीय काँग्रेस पार्टी खेडच्या अध्यक्षा सौ. संध्याताई जाधव , ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या नीतू अरोरा व जितेंद्र खैरनार सचिव महेश विद्यालय कोथरूड यांची उपस्थिती लाभली.संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख , अध्यक्ष शामराव देशमुख ,रोहिणीताई देशमुख, सौ. सुमनताई देशमुख विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. स्वाती रणदिवे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाहुण्यांचे स्वागत सौ. वंदना सरनाईक यांनी तर पाहुण्यांची ओळख सीता नायकवाडी यांनी केली. विद्यार्थ्यांनी विविध मंत्रमुग्ध करणारे संगीतमय कार्यक्रम व डोळ्यांचे पारणे फेडणारी सामूहिक नृत्ये सादर करून पालक व उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रणदिवे, विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल , राक्षेवाडी चे प्राचार्य दीपक शिंदे व विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल चाकणच्या मुख्याध्यापिका रैना मून व विद्याव्हिजन किडीज गार्डनच्या मुख्याध्यापिका नीलम सिंग यांनी आपापल्या विभागाचे वार्षिक अहवाल सादर केले.यानंतर विविध स्पर्धांमध्ये व शैक्षणिक विभागात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय राज देशमुख , संचालिका हर्षल ताई देशमुख , मा. डी .पी . सोनवणे , विजयाताई पाटील यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. संजय सिंग यांनी मोबाईल व बाह्य खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेश पालकांना दिला.संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख सर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका सौ.श्री मोहन्ती संगीत शिक्षिका नयन बाळसराफ यांचे व सर्व विद्याव्हॅली व विद्यानिकेतन टीमचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेत विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौं स्वाती रणदिवे व विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दीपक शिंदे यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला विभागाच्या प्रमुख रोहिणी वैद्य व इयत्ता ९ वी तील विद्यार्थी कु .स्वामी मंडलिक , श्रुतिका करवीर कु .सार्थक पवार , कु .सोनाली उपाध्याय व कु. अनघा विखे या विद्यार्थ्यांनी केले . ‘ कार्यक्रमाची सांगता कु. मयुरी शिंदे यांच्या आभार प्रदर्शन व वंदे मातरम् च्या गीत गायनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy