(चाकण प्रतिनिधी ) आजच्या इंटरनेट च्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर जर योग्य कामा साठी केला तर आज सोशल मीडिया वर सर्वात जास्त प्रभावशाली माध्यम म्हणून जगभरात नावारुपास आले आहे.समाज माध्यमातून फेसबुक, ट्विटर हॅन्डल,व्हाट्सप चा वापर केला जातो.मनोरंजनाबरोबरच आलेले मेसेज फॉरवर्ड करणे ,विविध पेमेंट करणे विविध ग्रुप तयार करून उपदेश,ज्ञानामृताचे डोस पाजणे अशा प्रकारे व्हाट्सप चा उपयोग लोक करत आहेत.याबरोबरच खुन्नस काढण्यासाठी स्टेटस ठेवणे,एकमेकांची उनिदुनि काढणे,व्हाटसप च्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया करणे,आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करणे असे समाजविघातक कामे पण काही समाज विघातक कृत्ये काही समाज कंटक करत असतात.पण व्हाटसप ग्रुपच्या माध्यमातून 5 लाखाची मदत गोळा करणे ,आणि त्यातून परदेशातून काही मदत गोळा करणे तेही आपल्या नात्यातून नसणाऱ्या व्यक्तीसाठी हे शिवधनुष्य पेललं आहे चाकण मधील एका अवलियाने..चाकण मधील योगशिक्षक नेचरोपथी तज्ञ,गेली 20 वर्षें समाजसेवक म्हणून परिचित असणारे जलयोगप्रशिक्षक डॉ. बापूसाहेब सोनवणे यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने थोडी नव्हे तर तब्बल 5 लाखांची मदत गोळा केली आहे .त्यांच्या सोबत सर्व आपदा मित्र,रेस्क्युअर शांताराम गाडे,अविनाश व्यवहारे(आयफेल सिटी) आणि राजू कंठक मदत गोळा करण्यासाठी व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या मुलींचा रामनवमी च्या दिवशी दुपारी 1.20 ला चाकण शिक्रापूर रोड वर अपघात झाला.मुली ज्या टेम्पोत बसून मामाच्या गावाला जात होत्या त्या टेम्पोला कंटेनर ने अक्षरशः चिरडले.दोन्ही मुलींच्या पायाला गंभीर इजा झाली चाकण मधील एका हॉस्पिटल ला अंबुलन्स च्या ड्रायव्हर ने ऍडमिट केले.सदर हॉस्पिटल ला दुपारी 1.20 ला ऍडमिट केल्यानंतर नातेवाईकांना सांगण्यात आले की पायाचे सर्जन ऑपरेशन साठी येत आहेत रात्री 10 वाजता अचानक नातेवाईकांना सांगण्यात आले की सर्जन येणार नाहीत पेशंट ला पुढे मोठ्या हॉस्पिटल ला हलवावे लागेल.पुढे साडेदहा वाजता मुलींना भोसरी येथील मोठ्या हॉस्पिटल ला हलवले गेले.मुलींना वडील नाहीत एक मुलगी इंजिनिअरिंग पास झालीय तर एक मुलगी तेरावी ला आहे.परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.आई शिवणकाम करते. वेळेत पायावर उपचार न झाल्याने मोठ्या मुलीचा पाय गुढग्यातून कापावा लागला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.काही तज्ञ वैद्यकीय व्यावसायिक म्हणतात की पायांना गंभीर इजा झाल्यास महत्वाचे गोल्डन हवर्स म्हणजे 6 तास महत्वाचे असतात या वेळेत ऑपरेशन झाले तर पाय वाचतात.पण याबाबतीत मोठी मुलगी दुर्दैवी म्हणावी लागेल कारण तिचा पाय कापल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दुसऱ्या पायात तीन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याने काल ते पण ऑपरेशन झाले.भरीस भर म्हणून उजव्या हाताला पण फ्रॅक्चर होते.दुसऱ्या छोट्या मुलीच्या मेंदूला इजा आहे.खांद्याचे ऑपरेशन झाले।आहे अजून एका खांद्याचे करावे लागेल.चेहऱ्याची प्रचंड प्रमाणात मोडतोड झाली आहे.दोन्ही पायांची ऑपरेशन करावी लागतील असे डॉक्टर म्हणतात.ती अजून बेशुद्धच आहे.आज कोणी कोणासाठी मदत करत नाही अशा वेळी हे सामाजिक कार्यकर्ते देवासारखे धावून आले असे नातेवाईक म्हणतात.सोनवणे यांनी परदेशातूनही मदत गोळा केलीय फ्रांस,जर्मनी,व्हिएतनाम ,USA येथील मित्र मैत्रिणींना मदतीचे आवाहन केल्यावर त्यांनी देखील मदत केली.तसेच सोनवणे यांचे सहा व्हाट्सप ग्रुप आहेत यात महाराष्ट्र भरातील IPS ,IAS अधिकारी,अनेक पोलीस अधिकारी,डॉक्टर्स,वकील,इंजिनिअर, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी ,महसूल खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी,वन विभागातील।अधिकारी,पत्रकार आहेत.यांनी देखील आपापल्या परीने मदत केलीय.सोनवणे यांचा योगा क्लब मधील विद्यार्थी आयफेल सिटीमधील रहिवास्यानी,व AV फिटनेस सदस्यांनी मदत केली.