छावा संघटनेच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षपदी शहाआलम बेग

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(चाकण प्रतिनिधी ) चाकण,महाळुंगे औद्योगिक वसहती मधील प्रसिद्ध उद्योगपती शहाआलम बेग यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मनोजअण्णा मोरे यांच्या शुभहस्ते व पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. संगीताताई नाईकरे पाटील व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

यावेळी अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र अध्यक्षा शन्नोताई शेख, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा सौ. आशाताई फडके महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. पूजाताई नेवाळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. रूपालीताई नाणेकर, खेड तालुका अध्यक्ष प्रवीणभाऊ करपे, पुणे जिल्हा कार्याध्यक्षा महानंदाताई चव्हाण, कामगार आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षा रंजनाताई चन्ने, खेड तालुका उपाध्यक्षा सौ. सुधाताई आगरकर खेड तालुका कार्याध्यक्षा सौ. लक्ष्मीताई वाळुंज चाकण शहर कार्याध्यक्षा हरियालीताई दुधानी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी शहाआलम बेग यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy