प्राध्यापिकेचा नको तो व्हिडीओ विद्यार्थ्यांने काढला आणि वायरल करण्याची धमकी देत केली पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी

Share This News

बातमी 24तास

(क्राईम रिपोर्ट) सोशल मीडिया जेवढं चांगले तेवढंच ते एखादा गुन्हा करायला भाग पाडते हे तेवढंच व वाईट आणि धोकेदायक,शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात सेक्सटॉर्शन चा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे शहरातील या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील नामांकित विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन केले आहे. यामुळे विद्यार्थी अन् प्राध्यापक या नात्याला धक्का बसला आहे. या प्रकाराची तक्रार पीडित प्राध्यापिकेने केल्यानंतर बिहारमधील रहिवाशी असलेल्या मयांक सिंग याच्यावर माहिती अन् तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा प्रकार मार्च २०२० पासून ते २६ जून २०२३ यादरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,पुणे शहरातील नामांकीत विद्यापीठातील परप्रांतीय विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकाचा एक व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर तो व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला अन् व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. मुळचा बिहारमधील पटणा येथील रहिवाशी असलेल्या आणि सध्या पुणे शहरात राहणाऱ्या मयंक सिंग याने हा प्रकार केला आहे. तो आपल्या प्राध्यापिकेशी इन्सटाग्राम अकाऊंटवरुन नेहमी संपर्कात असायचा. त्यानंतर मोबाईलने संपर्क करु लागला. मग व्हॉट्सअप कॉल करु लागला. मयंकने एकदा प्राध्यापिकेला फोन केला अन् सांगितले की, आपला जो संवाद झाला आहे, तो मी व्हायरल करेल, त्यामुळे मी सांगेल तसे करा.प्राध्यापिकेने घाबरुन मयंक सांगत होता , तसे करणे सुरु केले. त्याने अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. त्याचे त्याने शुटींग केले. मग तो व्हिडिओ महिला प्राध्यपिकेच्या पतीला पाठवला आणि सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. जर आपणास पाच हजार अमेरिकन डॉलर दिले नाही तर आपण हा व्हिडिओ व्हायरल करु, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे प्राध्यापिका अन् तिच्या पतीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे.

*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy