बातमी 24तास(मुंबई प्रतिनिधी )गेली दोन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, मुंबईत मात्र पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलं. याबाबत पत्रकारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पाणी साचलं याची तक्रार का करता, पाऊस झाला याचं स्वागत करा. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे. अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो.आता पाऊस पडतोय तर बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात. असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड येथे हजर राहून पाणी साचण्याची कारणे जाणून घेत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर सांताक्रूझ येथील मिलन सबवेला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.
काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणचा परिसर हा जलमय झाला होता. शहरात जागोजागी पाणी साचल्याने त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाणी साचणाऱ्या जागाना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच याठिकाणी पाणी साचू नये, असे सक्त निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला दिले. तसेच ट्रॅफिक जॅम होऊन इथे वाहने अडकून पडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…