शाळेत समुपदेशन प्रसंगी एका विद्यार्थिनीने शिक्षिकेला आपल्यासोबत चार वर्षा पूर्वी झालेल्या सामूहिक बलात्काराबद्दल सांगितलं. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल.

Share This News

बातमी 24तास WebNewsPortal

(क्राईम रिपोर्टर )

शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन कार्यक्रमातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली असून,तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हासदर पीडित मुलगी १३ वर्षाची होती, तर सातवीच्या वर्गात शिकत होती.हा प्रकार २०१८ ते २०१९ दरम्यान घडला आहे.या प्रकरणी, मुन्ना नदाफ याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भा.द.वी. ३७६. ३७६ ड, ३७६ अ ब, ३४२ सह पोक्सो ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमा दरम्यान शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना पीडित मुलीने ही घटना त्यांना सांगितली. आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचयाचे देखील आहेत. २०१८ ते २०१९ या कालावधीत पीडित मुलगी घराशेजारील गल्लीत खेळत होती.यावेळी एका घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू खाली पडली. पडलेली वस्तू देण्यासाठी फिर्यादी घरात गेली असता घरात असणाऱ्या आरोपींनी पीडित मुलीला घरात ओढून घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर या मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावून तिच्यावर तीनही आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

“या संपूर्ण घडलेल्या प्रकारबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझे आणि घरच्यांचे हाल करेन”, अशी धमकी देखील दिली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy