बातमी 24तास Web News Portal
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक ५ बाधित शेतकऱ्यांनी सक्तीने जमीन देण्यास नकार दिला असून एमआयडीसी द्वारा पाठवण्यात आलेल्या सक्तीच्या संपादन नोटीसीची होळी चाकण मार्केट यार्ड येथे केली असून सरकार आमच्यावर जबरदस्ती करत आहे भूमाफियांप्रमाणे आमच्या जमिनी सरकार हडप करत आहे सरकारच्या या गुंडगिरीला आम्ही खपवून घेणार नाही वेळप्रसंगी जीव देऊ पण जमीन देणार नाही सरकारने म्हणजेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावास मान्यता दिली त्यानंतर एमआयडीसी ने या नोटिसा पाठविला असून सदर पाठवलेल्या नोटीसीची आम्ही आज होळी करत असून जर सरकार आमचे ऐकणार नसेल तर येणाऱ्या काळात शेतकरीच या सरकारची होळी करतील अशा संतप्त प्रतिक्रिया बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.याप्रसंगी दशरथ काचोळे मोबीन काझी, राम गोरे,भरत गोरे, बापू चव्हाण, नवनाथ चौधरी, दत्ता चौधरी, जयप्रकाश परदेशी, मंदार परदेशी, निलेश गोरे, दत्ता गोरे, संभाजी पडवळ, किरण पडवळ, भरत पवळे,ॲड.निलेश कड पाटील उपस्थित होते.महाविकास आघाडी सरकारने संमतीने जमीन संपादन केले पण सक्ती केली नाही पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात सरकार शेतकऱ्यांचे आहे मग शेतकऱ्यांवर जमीन संपादन सक्ती का केली जात आहे? हे समजत नाही महाविकास आघाडी बाधित शेतकरी वर्गाबरोबर आहे आम्ही तीव्र आंदोलन करू शेतकऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही.