
बातमी 24तास चाकण (प्रतिनिधी) : खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर संघ, राजगुरूनगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.हा कार्यक्रम रिद्धी सिध्दी मंगल कार्यालय, चांडोली, पुणे–नाशिक महामार्ग, ता. खेड, जि. पुणे येथे संपन्न होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष• आण्णा बनसोडे (उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य)शुभहस्ते• बाबाजीशेठ काळे (आमदार, खेड तालुका)• महेशदादा लांडगे (आमदार, भोसरी)• दिलीपशेठ मोहिते (मा. आमदार, खेड)• जयंत असगावकर (शिक्षक आमदार, पुणे विभाग)प्रमुख अतिथीया सोहळ्यास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी अतुल देशमुख (जि.प.सदस्य), कै. प्रा. सुरेश भागुजी कड यांच्या स्मरणार्थ, सुनिल शंकर कड (गुरूजी, उद्योजक), राजकुमार राऊत (अध्यक्ष, पु. जि. अम्यु. कबड्डी फां.) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.विशेष बाबीखेड तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या व्यासपीठावर गौरवण्यात येईल.

बातमी व सर्व प्रकारच्या जाहिराती साठी संपर्क : 9822372237 9922202829 9370610399